Dainik Maval News : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व शिवसेना उबाठा पक्षाचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराचे काम तुम्ही करणार का, असा थेट सवाल भाजपाचे तळेगाव शहराचे अध्यक्ष संतोष दाभाडे-पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केला. मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- एसआरपी महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते.
संतोष दाभाडे म्हणाले की, भाजपाने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाशी युती केली आहे. त्यानंतर सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यावेळी वाटलं की सगळे मिळून महायुती धर्माचे पालन करून पण प्रत्यक्षात वेगळेच घडले. काही कार्यकर्ते इकडे आहेत तर काही कार्यकर्ते तिकडे आहेत. पण भाजप हा शिस्तीचा व निष्ठेचा पक्ष आहे. एकदा पक्षाने निर्णय घेतला की तो मान्य करावाच लागतो.
आमच्यावर जयवंतराव दाभाडे, नथुभाऊ भेगडे, केशवराव वाडेकर, बाळासाहेब जांभूळकर यांचे संस्कार आहेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही वाटचाल करतो. एकदा तळेगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे 12 नगरसेवक तर शहर विकास समितीचे 11 नगरसेवक होते. अशा वेळी देखील नगराध्यक्ष निवडणुकीत कधीही कोणतीही गडबड झाली नव्हती, याकडे संतोष दाभाडे यांनी लक्ष वेधले.
‘आधी भाजपच्या पाठिंब्याचे पत्र दाखवा’
महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पाठिंबाची पत्रके भाजपचे नेते गोळा करीत आहेत, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. इतर पक्षांची पत्रे गोळा करण्याआधी त्यांनी भाजपच्या पाठिंबाचे पत्र दाखवावे, असा जबरदस्त टोला संतोष दाभाडे यांनी लगावला. भाजपचा झेंडा नाही, भाजपच्या नेत्यांचे फोटो नाही, मग हा कसला ‘सर्वपक्षीय’ उमेदवार, असा शेरा देखील त्यांनी मारला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वातावरण तापलं ! मावळात शेळके आणि भेगडे यांचे कार्यकर्ते आमनेसामने, पोलिसांच्या मध्यस्थीमुळे परिस्थिती नियंत्रणात
– कार्ला, कुसगाव, ओळकाईवाडी येथे लोणावळा ग्रामीण पोलिसांचे सशस्त्र पथ संचलन । Lonavala Police
– दुकाने, मॉल आणि महिला बचत गट येथील कामगार वर्गात मतदान करण्याविषयी जनजागृती