व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळके यांनी खरंच धनगर समाजाचा अपमान केलाय का? कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी ही बातमी नक्की वाचा

मावळात प्रत्यक्ष लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्थात महायुतीचे उमेदवार आमदार सुनिल शेळके आणि अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्यात होणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 12, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
MLA Sunil Shelke accused of insulting Dhangar community Read true situation Maval Vidhan Sabha

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघात सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. मावळ मतदारसंघात एकूण सहा उमेदवार रिंगणात असले, तरीही प्रत्यक्ष लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्थात महायुतीचे उमेदवार आमदार सुनिल शेळके आणि अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्यात होणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून सध्या प्रचाराचा धुरळा सुरु आहे. दोन्ही बाजूनी आरोप – प्रत्यारोप, टीका – टीपण्णी मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे मावळ मतदारसंघातील राजकीय वातावरण सध्या तापलेलं दिसत आहे. यादरम्यान एक मुद्दा सर्वाधिक चर्चेत आहे, किंबहुना आता या मुद्द्याची धग राज्यभर पोहोचताना दिसते, ती म्हणजे ‘आमदार सुनिल शेळके यांनी धनगर समाजाचा अपमान केलाय’ अशी टीका शेळके यांच्यावर होत असून त्यांच्या भाषणाची एक क्लीप व्हायरल केली जात आहे. प्रत्यक्षात हे प्रकरण काय आहे? आमदार शेळके यांनी धनगर समाजाचा खरंच अपमान केलाय का? की या मुद्द्याचे फक्त राजकारण होतंय? हे सर्व जाणून घ्यायचे असल्यास ही बातमी संपूर्ण वाचा…

Novel NIBR Ads

घटनेची पार्श्वभूमी…
आमदार सुनिल शेळके यांनी दिनांक 3 नोव्हेंबर रोजी, वडगाव मावळ येथून आपल्या प्रचाराची सुरुवात केली. वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात नारळ वाढवून शेळकेंनी आपल्या विधानसभेच्या निवडणूक प्रचाराला प्रत्यक्ष वडगाव शहरातून सुरुवात केली. यावेळी वडगाव बाजारपेठेतून प्रचार रॅली काढल्यानंतर पंचायत समिती चौक येथे रस्त्यावरच एक छोटेखानी सभा संपन्न झाली. यावेळी आमदार सुनिल शेळके यांसह खासदार श्रीरंग बारणे, आरपीआयचे नेते सूर्यकांत वाघमारे, भाजपाचे नेते देविदास कडू आदी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर आमदार सुनिल शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात शेळके यांनी निवडणूकीत सोबत न राहिलेल्या आणि ऐन निवडणूकीत आपल्याला सोडून गेलेल्या पुढाऱ्यांना लक्ष केले. यावेळीच बोलत असताना शेळके यांनी माजी मंत्री मदन बाफना यांच्या एका गाजलेल्या विधानाचा दाखला देत विधान केले.

नेमकं काय म्हणाले सुनिल शेळके?
आमदार सुनिल शेळके यांच्या त्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ दैनिक मावळच्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे. तसेच या बातमीत देखील आपण तो जोडला आहे. त्या व्हिडिओत ८.३७ ते १०.१२ या दरम्यान सुनिल शेळके यांनी धनगर – मेंढरं याबाबत विधान केले आहे. आमदार शेळके म्हणाले की, “अरे पुढारी मंडळींनो, ज्यांनी माझी साथ सोडली, त्या पुढारी मंडळींसाठी मी काय काय केलं हे ज्या गावात जाणार त्या गावात सांगणार. का सांगणार ? तर बाफना साहेब म्हणायचे, त्यांचा एक जुणा डायलॉग होता, एक धनगर संभाळता तर बाकीची मेंढरं अपोआप मागे येतात. बाफना साहेब, तुम्ही धनगर संभाळले, तुम्ही धनगर घेऊन गेले. पण आख्खी मेंढरं माझ्या मागे आहेत. आणि त्या मेंढरांना देखील माहितीये, माझ्या मावळातील मेंढरांना देखील माहितीये, की आता धनगर मेंढरांना पुढं घेऊन जाणार आहे. धनगर खाटकाकडं चाललाय, पण माझी माणसं माझी बकरं जाणार नाही. तुम्ही काळजी करू नका. माणसांवर प्रेम केलं. एवढ्या विश्वासाने जीवापाड माणसांनी मला जपलं. दिवस पाहिला नाही की रात्र, माणसांसाठी काम केलं.”

सुनिल शेळकेंनी धनगर समाजाचा अपमान केला का?
जर वरील विधान पाहिले तर आमदार सुनिल शेळके यांनी कुठेही धनगर समाजाचा किंवा मेंढरं असं संबोधून जनतेचा अपमान केल्याचे प्रथम दर्शनी दिसत नाही. मावळ तालुक्यातील राजकीय परिस्थितीची माहिती असलेल्या कुठल्याही नागरिकाला, सोडून गेलेले धनगर म्हणजे सुनिल शेळके यांना सोडून गेलेले पुढारी आणि मागे राहिलेलील मेंढरं ही मावळची जनता जी आपल्या सोबत आहे, असं सुनिल शेळके बोललेले दिसतात. यात सुनिल शेळके यांनी जनतेने आपल्याला स्विकारुन आपल्या सोबत राहण्याचा निर्धार केल्याचा आणि पुढारी मात्र सोडून गेल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला असून त्यात माजी मंत्री बाफना यांच्या डायलॉगचा आधार घेतल्याचा दिसतो. परंतु शेळके यांचे विधान हे धनगरांचा अपमान असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करून वातावरण निर्मिती करण्याचा अथवा धनगर समाज हा शेळकेंच्या विरोधात उभा करण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रथम दर्शनी दिसते.

अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनीही केलेली टीका
सुनिल शेळके यांनी केलेल्या विधानावर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांनी पाच दिवसानंतर आक्षेप घेतला आणि ते विधान चुकीचे असल्याचे म्हटले. त्यासाठी त्यांनी एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला. त्यात बापूसाहेब म्हटले की, “तालुक्याचे आमदार सुनिल शेळकेंनी खुप वाइट विधान केले आहे. त्यांनी असं विधान केलं, धनगर गेले आणि मेढरं राहिली. याचा अर्थ काय होतो? खरं तर हा आमच्या धनगर बांधवांचा अपमान आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा अपमान आहे. ज्या दिवशी या धनगर समाजाच्या काठीचा फटका त्याला पडेल, त्यावेळी तो जागेवर येइल. अशा व्यक्तीची एकच गोष्ट आपल्याला लक्षात येते की, तो जातीभेद करतो. धर्मभेद करतो. ही खरं तर आपल्या भारतासाठी, महाराष्ट्रासाठी खूप अपमानास्पद बाब आहे. खरं तर सगळी नेते मंडळी, समाजकारण करणारी मंडळी ज्यासाठी भांडतात, तो विचार एकतेच्या माध्यमातून उभा राहतो. त्या गोष्टी आपण करत नाही. आमच्या सर्व कार्यकर्त्यांना तू मेंढरं म्हणाला. मेंढराची उपमा देत असताना तो काय समजतो, तो माझा परिवार आहे. प्रवाह वेगवेगळा असले, पण या भारताचे आपण नागरिक आहोत. याचे त्याला भान राहत नाही.”

Novel NIBR Ads

एकंदरीत सुनिल शेळके यांच्या विधानाचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने लावून किंवा त्या व्हिडिओच्या क्लीप अर्धवट दाखवून राजकीय परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे, प्रथमदर्शनी दिसत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा मतदारसंघात मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया पूर्ण । Maval Vidhan Sabha
– ‘ते’ आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधून देणार होते त्याचे काय झाले ? – बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade
– मावळ तालुक्यात संस्कृती, परंपरा जोपासण्याचे काम केलंय – आमदार सुनिल शेळके । Sunil Shelke


dainik maval jahirat

Previous Post

मोठी कारवाई ! मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटणे टोलनाक्यावर एकाच दिवशी दोन मोटारीतून लाखोंची रोकड जप्त । Maval Crime

Next Post

सोसायट्यांमधील रहिवाश्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रयत्नशील – बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Vidhan Sabha independent candidate Bapu Bhegde campaign in Talegaon Dabhade

सोसायट्यांमधील रहिवाश्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रयत्नशील - बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Approval granted for permanent pictorial postal cancellation mark for Shrimant Mahadji Shinde Memorial Vadgaon Maval

वडगावच्या ऐतिहासिक वारशाचा राष्ट्रीय सन्मान ! श्रीमंत महादजी शिंदे स्मारकास कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यास मान्यता

June 27, 2026
Cancel the Pavana closed water channel project permanently

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

June 27, 2026
MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
Issue of traffic congestion at weekly market in Vadgaon Maval comes to fore

वडगाव मावळ येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

June 26, 2026
Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.