Dainik Maval News : भरधाव वेगातील टेम्पोने रिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि.१३) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास चाकण तळेगाव रस्त्यावर घडली.
अनिल ज्ञानेश्वर गाडे (वय ४१, रा. सुदुंबरे ता. मावळ, जि. पुणे) असे अपघातात जखमी झालेल्या रिक्षा चालकाने नाव असून त्यांचे नातेवाईक उत्तम मारूती गाडे (वय ४५) यांनी गुरुवारी (दि. १४) याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (एमएच ४३ एडी ३०२९) या टेम्पोवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गाडे यांचे नातेवाईक अनिल गाडे आपल्या रिक्षातून तळेगाव चाकण रस्त्यावरून चालले होते. ते खालुंब्रे गावाच्या हद्दीत असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ आले असता त्यांच्या रिक्षाला आरोपी चालवत असलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली.
अपघातात टेम्पो चालक अनिल ज्ञानेश्वर गाडे हे गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या रिक्षाचेही नुकसान झाले. अपघातानंतर टेम्पो चालक घटना स्थळी न थांबत, जखमी वैद्यकिय उपचारासाठी मदत न करता पळून गेला. महाळुंगे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांनी आंबेडकरी जनतेला सर्वाधिक न्याय दिला – सूर्यकांत वाघमारे
– मावळ विधानसभा मतदारसंघात मतदार ओळख चिठ्ठी वितरणास सुरुवात । Maval Vidhan Sabha
– खून प्रकरणी तिघांना अटक ; मावळ तालुक्यातील नानोली येथील प्रकार । Maval Crime