Dainik Maval News : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी (दि. 21 नोव्हेंबर) पहाटे तीन वाजताच्या सुमारास मोठा अपघात झाला. कोंबड्यांची वाहतूक करणााऱ्या एका टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोर जात असलेल्या खासगी बस ट्रॅव्हल्सला धडक दिली. यामुळे समोरची बस द्रुतगती मार्गालगतच्या 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली. सुदैवाने अपघातात कोणीही दगावले नाही. परंतु गंभीर आणि किरकोळ असे एकूण 9 प्रवासी जखमी झालेत.
गुरुवारी (दि. 21 नोव्हेंबर) रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास सांगोला ते मुंबई असा प्रवाल करणारी खासगी बस (क्रमांक MH 03 CV 5853) मुंबई-पुणे द्रुतगीत मार्गावरील किलोमीटर 35.200 या ठिकाणावरून जात असताना पाठीमागून येत असलेल्या कोंबडी वाहतूक करणारा टेम्पो (क्रमांक MH 14 HU 1069) या वाहनाचा ब्रेक फेल होऊन टेम्पोने बसला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे सदरची बस द्रुतगती मार्ग सोडून रस्त्याच्या बाजूला 20 फूट खोल खड्ड्यात पलटी झाली. बसमध्ये बस चालक सहीत 11 प्रवासी होते. त्यांना आयआरबी चे देवदूत पथक, खोपोलीचे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे पथक, एचएसपी व खोपोली पोलीस स्टेशन यंत्रणांने सुखरूपणे बाहेर काढले. किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्याने जखमींना खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आलेले आहे. कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधील तीन गंभीर जखमी रुग्णांना एमजीएम हॉस्पिटल कळंबोली येथे रवाना करण्यात आले. हा अपघात खोपोली पोलीस स्टेशन हद्दीत झाला आहे.
अपघाताचा अधिक तपशील :
वाहनांचे डिटेल्स –
टेम्पो (कोंबडी वाहतूक करणारे वाहन) क्रमांक – MH 14 HU 1069
अरुण ट्रॅव्हल्स बस (सांगोला ते मुंबई प्रवास करणारी खासगी बस) क्रमांक – MH 03 CV 5853
अपघातामधील जखमी –
गंभीर जखमी ( टेम्पोतील प्रवासी)
1) शाहिद मोहम्मद
2) इरफान अयुब खान
3) कैफ शेख महम्मद इनामदार
किरकोळ जखमी (बसमधील प्रवासी)
1) एम. रविचंद्रन – 42 (चालक)
2) भाऊसाहेब जगन्नाथ कदम – 42
3) इंद्रजित काशीद वय – 09
4) स्मिता माने वय – 45
5) आक्काताई मधुकर काशीद – 55
6) सुभाष काशीद – 42 (सोलापूर)
अपघातानंतर तातडीने मदतकार्य केल्याने वाहतूकीस कोणताही अडथळा आला नाही. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महाराष्ट्र सुरक्षा बल, डेल्टा फोर्स, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, लोकमान्य ॲम्बुलन्स, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, खोपोली पोलीस स्टेशन या सर्वांनी जलदगतीने मतदकार्य केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सुनिल शेळके यांचे पत्नी सारिका शेळकेंसह मतदान, लाखाच्या लीडने जिंकण्याचा व्यक्त केला विश्वास । Maval Vidhan Sabha
– मावळ मतदारसंघातील उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क । Maval Vidhan Sabha
– मतदारांनो… मतदान कार्डासह मतदानासाठी ‘हे’ 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावा म्हणून वापरता येणार – पाहा यादी