Dainik Maval News : मावळ विधानसभा निवडणूक कालावधीत गैरप्रकार रोखण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तळेगाव वाहतूक विभाग पोलिसांनी काळ्या काचा असलेल्या वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली होती. त्यात दिनांक १८ नोव्हेंबरपर्यंत एकूण १८९ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच संबंधित वाहन चालकांकडून २ लाख १५ हजार ५०० रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला.
मावळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यात मतदारांना काळ्या काचा असलेल्या चारचाकी वाहनातून पैसे आणि भेटवस्तू दिल्या जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या.
त्यामुळे डीसीपी ट्राफिक बापू बांगर यांच्या सूचनेनुसार, सदर तक्रारींची दखल घेऊन तळेगाव दाभाडे शहर परिसरात तीन दिवस विशेष नाकाबंदी करीत मोहीम राबविण्यात आली. यात काळ्या काचा असलेल्या चार चाकी वाहनांची तपासणी करून एकूण १८९ वाहनांवर व चालकांवर कारवाई करीत दंड वसूल करण्यात आला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा मतदारसंघात 72 टक्के मतदान, महिला वर्गाचे विक्रमी मतदान : कोण बाजी मारणार ? । Maval Vidhan Sabha
– द्रुतगती मार्गावर टेम्पो आणि बसचा भीषण अपघात, बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली । Accident On Mumbai Pune Expressway
– मावळात यंदा विक्रमी मतदान, मागील तीन निवडणुकांचा इतिहास काय सांगतो? वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला? । Maval Vidhan Sabha