Dainik Maval News : ग्रामीण भागातील रुग्णांना त्यांच्या परिसरात आणि अत्याधुनिक रुग्णसेवा मिळावी, यासाठी तळेगाव दाभाडे येथील टीजीएच-ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरच्या वतीने डे-केअर केमोथेरेपी विभाग सुरू केला आहे. सदर विभागाचे उद्घाटन माजी खासदार व नर्गिस दत्त फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रिया दत्त यांच्या उपस्थित झाले.
यावेळी सेंटरचे संस्थापक अध्यक्ष गणेश खांडगे, अध्यक्ष शैलेश शाह, सचिव सत्यजित वाढोकर, सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उदय देशमुख उपस्थित होते. या विभागात अत्याधुनिक सुविधांसह १२ बेडची व्यवस्था असणार आहे. ग्रामीण भागातील वंचित रुग्णांपर्यत रुग्णसेवा पोहोचविण्याचे कार्य नर्गिस फाऊंडेशन करते.
उदय देशमुख म्हणाले, ग्रामीण भागातील रूग्णांना कॅन्सरवर मात करण्यासाठी शहरापेक्षा जवळच्या परिसरात रुग्णाला परवडणाऱ्या दरात उपचार पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी सातारा, चिपळूण, तळेगाव आणि वाघोली केंद्रावर तज्ज्ञ डाॅक्टर आणि अत्याधुनिक यंत्रसामग्री आहे. सेंटरचे संचालक सचिन देशमुख आणि डॉ. संतोष साहू यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पवनानगर येथील व्याख्यानात वसंत हंकारे यांच्याकडून ‘बाप समजावून घेताना’ हजारो विद्यार्थ्यांना भावना अनावर । Pavananagar
– पवना धरणात 2 युवक बुडाल्याचे प्रकरण : बंगला मालकासह नाव मालकाविरुद्ध गुन्हा दाखल । Pavana Dam News
– मावळ तालुक्यात शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान राबविले जाणार । Maval News