Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने शहरात मालमत्ता कराची वसुली मोहीम हाती घेतली असून यावर्षी शंभर टक्के कर वसुली करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पालिकेने शहरातील मालमत्ता धारकांना याबाबत नोटीसा नोव्हेंबर महिन्यातच पाठविलेल्या आहेत.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर संकलन विभाग प्रमुख कल्याणी लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कर वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत एकूण ३७ हजार मालमत्ता धारक असून त्यांच्या कडून मालमत्ता करापोटी 33 कोटी 90 लाख 28 हजार 605 रुपये वसूल करणे आहे. तर पाणीपट्टी म्हणून 9 कोटी 66 लाख 66 हजार रुपये वसूल करायचे आहेत. या वसुलीसाठी नगरपरिषदेने विशेष नियोजन केले आहे.
त्यासाठी शहराचे 12 विभाग करण्यात आलेआहेत. तर 12 विशेष वसुली अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत 2 कोटी 18 लाख 32 हजार रुपये वसूल झाले असून आतापर्यंतची वसुली २३ टक्के आहे. वसुली मोहिमेचा दररोजचा आढावा मुख्याधिकारी सरनाईक घेत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळमधील ‘हे’ गाव आहे संत संताजी जगनाडे महाराज यांचे जन्मगाव, जयंती निमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनकार्य
– तुमच्या आमदाराला दर महिन्याला किती पगार मिळतो ? आमदारांना मिळणारे भत्ते आणि सुविधा वाचून धक्का बसेल
– मावळमधील शिक्षकांनी कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंसमोर मांडल्या समस्या । Maval News