व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, May 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सुनीलअण्णांच्या शिलेदारांची बातच न्यारी… मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना थेट आकाशातून गवसणी

तब्बल ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून झळकविले अभिनंदनाचे फलक

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 11, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Maval Vidhan Sabha Paragliders from 700 feet height felicitation of MLA Sunil Shelke & mahayuti government

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी विधानसभेत दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्याच वेळी मावळातील ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून महायुती सरकारच्या अभिनंदनाचे बॅनर झळकावत आमदार शेळके यांना मंत्रिपदाची संधी मिळण्यासाठी मावळातील या शिलेदारांनी चक्क आकाशातून महायुतीच्या नेत्यांना गवसणी घालत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विधिमंडळ अधिवेशन व मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे मावळ तालुक्याच्या भूमीत एक नवा उत्साह संचारला आहे.

‘आमचं ठरलंय’ बॅनरचे आकर्षण
पॅराग्लायडिंगद्वारे हवेत झळकलेल्या फलकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद असे नमूद करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचे फलकही झळकविण्यात आले. याखेरीज सुनील शेळके यांच्यासह धनंजय मुंडे, सुनील तटकरे, उदय सामंत, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, आदिती तटकरे, पंकजा मुंडे या संभाव्य मंत्र्यांचे फोटो असलेल्या फलकांच्या माध्यमातून मंत्रिमंडळाबाबतची मावळवासीयांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. “आमचं ठरलंय” असा संदेश देणारे हे बॅनर मावळातील जनतेचा सरकारप्रती असलेला विश्वास आणि अपेक्षांचे प्रतीक ठरले.

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सहकाऱ्यांकडून राबवण्यात आलेल्या या अभिनव संकल्पनेने महायुतीच्या सरकारला तरुणाईची कल्पकता दाखवून दिली आहे. पॅराग्लायडिंगद्वारे अभिनंदन आणि मंत्रिपदासाठी अपेक्षा व्यक्त करण्याची ही कल्पना राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे.

मावळ पॅराग्लायडिंग असोसिएशनचे अध्यक्ष रमेश भुरुक आणि त्यांच्या टीमने या अनोख्या उपक्रमाची धुरा सांभाळली. या उपक्रमात पंकज गुगळे, प्रवीण शिंदे, भाऊ गायकवाड, बाळासाहेब कुडले, गणेश शिंदे, गणपत नेवाळे, विकास शेलार, सनी कोळेकर, योगेंद्र भुल, दत्ता कोंढरे, दत्ता म्हाळसकर या तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

महायुती सरकारचा नवा अध्याय
महायुती सरकारच्या स्थापनेनंतर राज्यात विकासाच्या नव्या पर्वाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मावळातील तरुणांनी दाखवलेला उत्साह आणि समर्थन ही महायुतीच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाची साक्ष आहे. या अनोख्या पद्धतीने दिल्या गेलेल्या शुभेच्छांनी मावळ तालुक्याला राज्यभर प्रसिद्धी मिळवून दिली आहे.

या उपक्रमाने राजकारणातील पारंपरिक अभिनंदनाच्या पलीकडे जाऊन तरुणाईच्या सर्जनशील दृष्टिकोनाची झलक दाखवली आहे.तसेच मावळ तालुक्यातील नागरिक आमदार शेळके यांच्या रुपाने मंत्रीपदाची वाट पाहत असून मावळ तालुका हा विकासाच्या उड्डाणासाठी तयार असल्याचा संदेश या अभिनव प्रयोगातून देण्यात आला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपी तरुणाला 20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ; वडगाव कोर्टाचा निर्णय । Maval Crime
– मोठी बातमी : इंद्रायणी नदीत बुडून मुलाचा मृत्यू… ‘तो’ बुडाला हे मित्रांनी कुणालाच सांगितले नाही, पोलिसांनी ‘असा’ घेतला शोध
– भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी, मावळातील बधलवाडी येथील घटना । Maval Accident News


Previous Post

पालकांनो… मुलांचे मित्र बना, त्यांना मोबाईलपासून दूर ठेवा

Next Post

महत्वाची बातमी : तळेगाव स्टेशन भागात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार । Talegaon News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Water-shut-off

महत्वाची बातमी : तळेगाव स्टेशन भागात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार । Talegaon News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

house of widow Shalan Dahibhate in Bedse Maval was gutted in fire caused by short circuit

एक वर्षापूर्वी पतीचे निधन, आता आगीत घर जळून खाक ; बेडसे गावातील शालन दहिभाते यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

May 20, 2026
Prostitution business on old Pune-Mumbai highway Many dens in Talegaon Vadgaon Dehu Road Somatane

पुणे-मुंबई महामार्गालगत वेश्या व्यवसाय तेजीत ! तळेगाव, वडगाव, देहूरोड, सोमाटणे हद्दीत अनेक अड्डे ; पोलिसांचे पाहूनही दुर्लक्ष

May 20, 2026
ECI Central Election Commission

मोठी बातमी ! पुणे जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक जाहीर ; आचारसंहिता लागू

May 19, 2026
fadnvis shinde pawar

महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटींच्या कामांना मान्यता

May 19, 2026
Pune District Collector Jitendra Dudi

पुणे जिल्ह्यात धरणे व तलावांमधील गाळ काढण्याच्या कामांना गती द्या – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

May 19, 2026
आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; संत तुकाराम महाराज जन्मस्थान विकासासाठी ४१ कोटींच्या आराखड्यास शासनाची मान्यता

May 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.