व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील आदिवासी पाड्यांवरील महिलांनाही मिळणार प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ, असा करा अर्ज । Maval News

खासदार श्रीरंग बारणे यांच्या तारांकीत प्रश्नाला महिला व बालविकास मंत्र्यांचे उत्तर

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 14, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
tribal Women in Maval will also get benefit of Pradhan Mantri Matruvandana Yojana

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ लोकसभा मतदारसंघात आदिवासींचे प्रमाण जास्त आहे. या महिलांना कागदपत्राअभावी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घेताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातून मार्ग काढण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी तारांकीत प्रश्नाद्वारे लोकसभेत केली. त्यावर आदिवासी पाड्यावरील महिलांनी अपत्य झाल्यानंतर केव्हाही अंगणवाडी, आशा सेविकांच्या माध्यमातून अर्ज करावा. त्यांना लाभ दिला जाईल अशी ग्वाही केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी दिली.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला पहिल्‍या अपत्‍यासाठी 5 हजार रुपयांची रक्‍कम दोन हप्‍त्‍यांत, तर दुसरे अपत्‍य मुलगी झाल्‍यास मुलीच्‍या जन्मानंतर एकाच टप्‍प्‍यात 6 हजार रूपयांचा लाभ आधार संलग्‍न बँक खात्‍यात किंवा पोस्‍ट ऑफिसमधील खात्‍यात डीबीटीद्वारे जमा केला जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना येत असलेल्या समस्यांबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी तारांकीत प्रश्न विचारला.

बारणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब, मजदूर या वर्गातील गरोदर महिलांसाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केली आहे. गरीब महिलांसाठी अतिशय लाभदायक आणि महत्वाची ही योजना आहे. या योजनेतील महिला लाभार्थ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. कागदपत्रे, लग्नाच्या अगोदरच आधारकार्ड वरील नाव, बँकेत खाते नसणे अशा अडचणींना सामोरे जावे लागते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी ज्या अडचणी आहेत. त्या दूर करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार आहेत. ही योजना आदिवासी महिलांपर्यंत पोहोचविली पाहिजे. मावळ लोकसभा मतदारसंघातील एका तालुक्यात आदिवासींचे प्रमाण जास्त आहे. या लोकांपर्यंत योजना पोहोचविली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न करावेत. त्यांना लाभ मिळवून द्यावा अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.

त्यावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी म्हणाल्या, महिलांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. महिला, मुले सदृढ राहिले तरच सशक्त भारत होईल. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत गरोदर महिलांना आर्थिक साहाय्य दिले जाते. समाजातील वंचित महिलांना मातृत्व लाभ देण्याचा योजनेचा हेतू आहे. या योजनेचा महिलांना लाभ घेण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पेपरलेस कामकाज सुरू केले आहे. त्यासाठी नवीन सॉफ्टवेअर बनविले आहे. स्वतः महिला यावर अर्ज करू शकतात. अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या माध्यमातून अर्ज करू शकतात.

डीबीटीच्या माध्यमातून याचे पैसे दिले जातात. या योजनेचा आतापर्यंत तीन कोटी 64 लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. 18 हजार 854 कोटी रुपये दिले आहेत. महाराष्ट्रात 36 लाखावून अधिक लाभार्थ्यांना 1 हजार 664 कोटी रुपयांचा लाभ दिला आहे. आदिवासी पाड्यावरील महिलांनी अपत्य झाल्यानंतर केव्हाही अंगणवाडी, आशा सेविकांच्या माध्यमातून अर्ज करावा. त्यांना लाभ दिला जाईल.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके इन ‘अ‍ॅक्शन मोड’ ! मावळ मतदारसंघातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची घेतली संयुक्त बैठक
– जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करा ; आमदार शेळकेंची अधिकारी व ठेकेदारांना तंबी
– गांजा बाळगल्याप्रकरणी तरूणाला अटक, गहुंजे हद्दीत पोलिसांची कारवाई, 20 लाखाचा मुद्देमाल जप्त । Maval Crime


dainik maval jahirat

Previous Post

जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत डी. गुकेश याने पटकाविले विश्वविजेतेपद ; विश्वविजेत्या गुकेशवर अभिनंदनाचा वर्षाव

Next Post

पेट्रोल पंपासमोर पार्क केलेल्या पाच हायवा वाहनांचे स्टार्टर चोरले, आंबी येथील घटना । Maval Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

पेट्रोल पंपासमोर पार्क केलेल्या पाच हायवा वाहनांचे स्टार्टर चोरले, आंबी येथील घटना । Maval Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.