Dainik Maval News : लोणावळा येथील ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल येथे गीता जयंती निमित्त भगवद्गीतेचे सामूहिक पठन करण्यात आले. यावेळी १००० विद्यार्थ्यांद्वारे गीतेतील १४ व्या अध्यायाचे पठन करण्यात आले. संस्थेच्या सचिव राधिका भोंडे यांनी विद्यार्थ्यांना गीतेचे जीवनातील महत्व सांगत चौदाव्या अध्यायामधील गुणत्र्यय विभाग संदर्भात तीन गुणांची ओळख करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप्रिता यादव यांनी केले, तर सोनाली कामे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शाळेचे शिक्षक नितीन तिकोणे यांच्यासमवेत एक हजार विद्यार्थ्यांनी सामुहिकरित्या गीतेतील १४ व्या अध्यायाचे पठण केले. ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल येथे दरवर्षी गीतेतील एका अध्यायाचे विद्यार्थ्यांद्वारे वर्षभर पठण केले आते आणि गीता जयंतीला त्याचे सामुहिक पठण केले जाते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. माधवराव भोंडे, संस्थेचे सदस्य संजय पुजारी, संजीव वीर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी थत्ते, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजुम शेख, उपमुख्याध्यापिका तृप्ती गव्हले, स्मिता इंगळे, पर्यवेक्षिका स्मिता वेदपाठक, शशिकला तिकोणे यांसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद टाकवे बुद्रुक शाळेचे वर्चस्व । Maval News
– मळवंडी ठुले येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न, पाहा संपूर्ण निकाल
– वारु व ब्राम्हणोली गावातील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, 108 ग्रामस्थांची आरोग्य तपासणी