व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अपघातग्रस्तांना गोल्डन अवर्समध्ये तातडीने मदत मिळणे आवश्यक

पाली- खोपोली, खारपाडा - सावरोली, पेण - खोपोली, कर्जत - खोपोली मार्गावर अपघातग्रस्तांना रुग्णवाहिका अभावी तातडीने मदत मिळत नसल्याने प्राण गमवावे लागत आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 18, 2024
in महाराष्ट्र
Accident victims should get immediate help during golden hours Khalapur Tehsildar Abhay Chavan

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : गेल्या काही दिवसात खालापूर तालुक्यातील विविध मार्गावर झालेल्या अपघातात बळी गेलेल्यांची संख्या पाहता अपघातग्रस्तांना गोल्डन अवर्समध्ये उपचारासाठी मदत मिळावी याकरिता तालुक्यातील विविध आस्थापना, संस्थांसोबत खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी औपचारिक बैठकीचे आयोजन केले होते.

पाली- खोपोली, खारपाडा – सावरोली, पेण – खोपोली, कर्जत – खोपोली मार्गावर अपघातग्रस्तांना रुग्णवाहिका अभावी तातडीने मदत मिळत नसल्याने प्राण गमवावे लागत आहेत. त्याकरिता या मार्गावरील अस्थापनांनी अपघातग्रस्तांना स्वमालकीची ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. त्यासाठी सीएसआर फंडाचा वापर करण्याचा सल्ला तहसीलदार अभय चव्हाण यांनी उपस्थितांना दिला.

इंडस्ट्रियल असोसिएशनचे चंद्रकांत कुलकर्णी, चौक उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ सविता कालेल, ए.एम.एन.एस. कंपनीचे किरण वैद्य, एपीआय ठाकरे यांनी या संकल्पनेचे स्वागत करून आपापले विचार मांडले. लवकरच याबाबतीत संयुक्तिक प्रक्रिया पूर्ण करून यंत्रणा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा आशावाद तहसीलदार अभय चव्हाण यांनी व्यक्त केला.

बैठकीदरम्यान अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरुनाथ साठेलकर यांनी प्रास्ताविक केले, तर नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी महसूल प्रशासनाकडून या समस्येवर उपाय योजनांसाठी अपेक्षित असलेल्या लोक सहभागाची आणि सहकार्याची विस्तृत मांडणी केली.

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेने बैठकीच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. एमएसआरडीसी, एमआयडीसी, पीडब्ल्यूडी, आयआरबी आणि आरोग्य खात्यातील अधिकारी यांच्यासह तालुक्यातील बहुतांशी कंपन्यामधील अधिकारी वर्ग या बैठकीस उपस्थित होता.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी ; आरपीआयचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन
– परभणी घटनेच्या निषेधार्थ पवनानगर बंद ! आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी । Pavananagar
– बनावट घड्याळ विक्री प्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल, देहूरोड येथील घटना । Maval Crime


Previous Post

मावळ तालुक्यातील नाणोली येथे एफएमएससीआय इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप फॉर टु-व्हिलर स्पर्धा संपन्न । Maval News

Next Post

माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पल्लवी दाभाडे यांना ‘राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच’ पुरस्कार । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
National Outstanding Sarpanch Award to Pallavi Dabhade Sarpanch of Malwadi Gram Panchayat

माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पल्लवी दाभाडे यांना 'राष्ट्रीय उत्कृष्ट सरपंच' पुरस्कार । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

government sudden increase in gas cylinder prices is unfair Maval Taluka Congress statement

सरकारने गॅस सिलिंडरची अचानक केलेली दरवाढ अन्यायकारक ; मावळ तालुका काँग्रेसचे निवदेन

March 12, 2026
MLA Sunil Shelke attention in session regarding issues in Dehuroad Cantonment area

रेडझोनचा प्रश्न, शिक्षण – आरोग्य – पाण्याची समस्या ; देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील प्रश्नांबाबत आमदार सुनील शेळके यांची अधिवेशनात लक्षवेधी

March 12, 2026
Agriculture Minister Dattatreya Bharane

खत विक्रीत अनियमितता आढळल्यास दोषी विक्रेत्यांचे परवाने सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेणार – कृषी मंत्री

March 12, 2026
Katkari community gets benefit of Rs 2 lakh 39 thousand from government for building house with toilet

शौचालय सहीत घरकुल बांधणीसाठी कातकरी समाजाला सरकारकडून मिळतो २ लाख ३९ हजार रुपयांचा लाभ

March 12, 2026
Renovation of classrooms at New English School in Vadgaon with Rs 31 lakh CSR fund from Astemo Fi Company

ॲस्टेमो फाय कंपनीच्या ३१ लाख सीएसआर निधीतून वडगावमधील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या वर्गखोल्यांचे नूतनीकरण

March 11, 2026
Hope for the Children Foundation honors accomplished women in social and administrative fields in Maval

‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मावळातील सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

March 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.