व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

चिमुकलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करा ; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना । Lonavala Crime

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत एका आदिवासी कुटुंबातील पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 29, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
Neelam-Gorhe

File Image - Neelam Gorhe


Dainik Maval News : लोणावळा (Lonavala Crime) ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत एका आदिवासी कुटुंबातील पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत बंदोबस्तावर असलेल्या नराधम सचिन सस्ते हा लघुशंकेचा बहाणाकरून हॉटेलच्या मागे गेला आणि चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. घडलेला प्रकार मुलीने आईला सांगितला. यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आरोपीस अटक केली. याप्रकरणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याशी संपर्क साधला असून संपूर्ण घटना जाणून घेतली.

बुधवारी दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पोलिसांकडून अधिकचा बंदोबस्त लावण्यात आला होता. पर्यटन स्थळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात येतो, पण तसे असतानाही हा भयानक प्रकार घडला. यामध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये एफआयर नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाची तत्काळ गांभीर्याने दखल घेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना घटनेतील आरोपी सचिन सस्ते या पोलीस कर्मचाऱ्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत उचित कार्यवाही करावी व आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याची दक्षता घेण्याचे सूचित केले. तसेच या प्रकरणात शासनाद्वारे योग्य कायदेशीर मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. त्याचप्रकारे, पीडित मुलीच्या पालकांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांचे समुपदेशन करत धैर्य दिले.

नराधम पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन –
विसापूर किल्ल्याच्या (Visapur Fort) पायथ्याला मद्यधुंद अवस्थेत चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधम पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे. सचिन सस्ते असे या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. त्याच्यावर पॉक्सोसह ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या़ंनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने आणि पोलीस निरिक्षक धुमाळ यांच्यासोबत चर्चा केली.

“लोणावळा खंडाळा परिसर सुप्रसिद्ध पर्यटन क्षेत्र असल्यामुळे अनेक पर्यटकांची येथे रेलचेल असते. या पर्यटकांमध्ये अनेक महिला आणि मुलींचा समावेश असतो त्यामुळे महिला मुख्यत्वे करून लहान मुली यांच्या संरक्षणाकरिता व त्यांना मदतीकरिता महिला पोलिसांची आवश्यकता आहे. तसेच यथाशक्य बालसमुपदेशक सुद्धा आवश्यक आहे. लोणावळा खंडाळा परिसरामध्ये स्थानिक पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी इतर क्षेत्रातील पोलिसांची अतिरिक्त कुमक गस्तीसाठी मागवावी लागते त्यामुळे बाहेरील पोलिसांची मदत घेते वेळेस त्यांची सेवा पडताळणी करणे आवश्यक वाटते.” – डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने सोमवारी 30 डिसेंबर रोजी वाहतूक मार्गात मोठा बदल – जाणून घ्या
– थर्टी फर्स्ट, नववर्षाच्या स्वागतासाठी पवना धरण परिसरात येण्याचा प्लॅन करताय ? आधी ही बातमी वाचा । Pavana Nagar News
– विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत मोठा बदल ; पाहा कोणते मार्ग बंद, कोणते सुरु


dainik maval jahirat

Previous Post

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत मोठा बदल ; पाहा कोणते मार्ग बंद, कोणते सुरु

Next Post

मावळातील भाविकांच्या बसचा पंढरपूर मार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू, 32 जण जखमी, नाणे गावावर शोककळा । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
big news Nane Maval devotees bus accident in Pandharpur two dead on the spot

मावळातील भाविकांच्या बसचा पंढरपूर मार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू, 32 जण जखमी, नाणे गावावर शोककळा । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
Maval beloved Omya passes away Bharat Kesari Omya the bull dies

मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन

August 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.