व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळातील भाविकांच्या बसचा पंढरपूर मार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू, 32 जण जखमी, नाणे गावावर शोककळा । Maval News

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेलेल्या मावळ तालुक्यातील भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 30, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर, शहर
big news Nane Maval devotees bus accident in Pandharpur two dead on the spot

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेलेल्या मावळ तालुक्यातील भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. प्राप्त माहितीनुसार हे सर्व भाविक मावळ तालुक्यातील नाणे, लोणावळा भागातील असून एका खासगी ट्रॅव्हल बसने सर्वजण पंढरपूरकडे गेले होते. भटुंबरे गाव (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथे त्यांच्या बसचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात बसमधील सर्व प्रवासी जखमी झालेत. यापैकी दोन जण जागेवरच गतप्राण झाल्याची माहिती मिळत आहे.

आज, रविवारी (दि. 29 डिसेंबर) सकाळी 6.15 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. ट्रॅव्हल्समध्ये मावळ तालुक्यातील एकूण 34 भाविक होते. त्यापैकी अपघातात 2 जण मृत पावले असून 12 जण गंभीररित्या जखमी असून त्यांना सोलापूर सिविल हॉस्पिटलला पाठविण्यात आले आहे. 20 जणांवर पंढरपूर सिविल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत, अशी माहिती नाणे मावळचे तलाठी विजय चव्हाण व पोलीस पाटील दत्ता वाल्हेकर यांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे गावात हा अपघात घडला. मावळमधील भाविकांच्या बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका तीव्र होता की यात बस आणि ट्रकच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही व्यक्ती नाणे (मावळ) येथील आहेत. तर इतर 32 जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचासाठी नेण्यात आले आहे.

राजनंदनी ट्रॅव्हल्सची बस नाणे (मावळ) येथील प्रवाशांना घेऊन जात होती. दरम्यान समोरून येणाऱ्या ट्रकला बसची धडक बसली. दोन्ही वाहने वेगात असल्याने दोन्ही गाड्यांच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. यात बसच्या केबिनचा तर चक्काचूर झाला. अपघात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर काहीजण गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना बाहेर काढलं. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस आणि ट्रकच्या धडकेमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून बाजुला करण्यात आली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने सोमवारी 30 डिसेंबर रोजी वाहतूक मार्गात मोठा बदल – जाणून घ्या
– थर्टी फर्स्ट, नववर्षाच्या स्वागतासाठी पवना धरण परिसरात येण्याचा प्लॅन करताय ? आधी ही बातमी वाचा । Pavana Nagar News
– विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत मोठा बदल ; पाहा कोणते मार्ग बंद, कोणते सुरु 


dainik maval jahirat

Previous Post

चिमुकलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करा ; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना । Lonavala Crime

Next Post

ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी नॅपकीनचे वाटप । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Distribution of free sanitary napkins to students in rural areas Maval News

ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी नॅपकीनचे वाटप । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
Maval beloved Omya passes away Bharat Kesari Omya the bull dies

मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन

August 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.