Dainik Maval News : मुंबई ते बंगळुरु प्रवासादरम्यान लोणावळा – खंडाळा येथे पर्यटनासाठी थांबलेला एकोणतीस वर्षीय युवकाची 200 मीटर खोल दरीतून सुटका करण्यात शिवदुर्ग मित्र टीम व लोणावळा शहर पोलिसांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इशराक (वय 29) हा तरुण मुंबई ते बंगळुरु प्रवासात लोणावळा येथे थांबला होता. शनिवारी (दि.4) तो लोणावळा ते खंडाळा असा प्रवास करून खंडाळा येथे पायी चालत एक्सप्रेस वेवरील खंडाळा बोगदाच्या पुढे दरीत उतरला व तिथेच अडकला.
त्यानंतर त्याने 112 क्रमांकावर संपर्क करून मदत मागितली. त्यानंतर पोलिसांनी शिवदुर्ग मित्रच्या मदतीने त्याचे लोकेशन शोधले. खुप वेळ शोधाशोध केल्यावर त्याचे ठिकाण सापडले. शुटींग पॉइंट या बंदी असलेल्या ठिकाणी सदर युवक पोहोचला होता.
त्याचे ठिकाण सापडल्यावर दोरीच्या साहाय्याने शिवदुर्गच्या सदस्यांनी त्याला सुखरुप वर काढले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. शिवदुर्गचे सचिन गायकवाड, सुनिल गायकवाड, योगेश उंबरे, रोहीत वर्तक, ओंकार पडवळ व लोणावळा शहर पोलिसचे पोलीस निरिक्षक सुहास जगताप व अन्य सदस्यांनी या मोहीमेत सहभाग घेतला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी जोडला जाणार ; वडगाव, कामशेत, लोणावळा ठाण्यांबाबत प्रस्ताव सादर
– मराठी शाळा स्मार्ट व डिजिटल बनविणे काळाची गरज ; परांजपे विद्या मंदिर शाळेला डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड भेट
– तळेगाव दाभाडे शहरातील 350 वर्षे पुरातन बामणडोह विहिरीचे होणार संवर्धन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात । Talegaon News