व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळातील कीर्तन महोत्सवाची आज होणार सांगता ; इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनसेवेला विक्रमी गर्दी होण्याची शक्यता

श्री विठ्ठल परिवार मावळ यांच्या माध्यमातून कामशेत येथे सुरु असलेल्या कीर्तन महोत्सवाचा आज (दि.5) अखेरचा दिवस आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 5, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
MLA-Sunil-Shelke-and-Nivritti-Maharaj-Deshmukh

Photo : MLA Sunil Shelke and Nivritti Maharaj Deshmukh


Dainik Maval News : श्री विठ्ठल परिवार मावळ यांच्या माध्यमातून कामशेत येथे सुरु असलेल्या कीर्तन महोत्सवाचा आज (दि.5) अखेरचा दिवस आहे. गेली चार दिवस सुरु असलेल्या या भक्तिमय सोहळ्याला मावळच्या कानाकोपऱ्यातून वारकरी भाविक उपस्थित राहत आहेत. आज रविवारी, कीर्तन क्षेत्रातील दिग्गज कीर्तनकार श्री निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांची कीर्तनसेवा होणार आहे. त्यामुळे आज गर्दीचा उच्चांक मोडला जाइल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून आणि श्री विठ्ठल परिवार मावळ यांच्या माध्यमातून गेली सात वर्षे अखंडपणे हा कीर्तन महोत्सव सोहळा कामशेत येथे पार पडत आहे. राज्यभरातील नामवंत कीर्तनकार आपली कीर्तनसेवा येथे करीत आहे. यावेळी मावळ तालुक्यातील कानाकोपऱ्यातील भाविक, वारकरी नागरीक कीर्तन श्रवणासाठी कामशेत नगरीत उपस्थित राहत आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमुळे ह्या कीर्तन महोत्सवाची शान आणखीन वाढत असून महाराष्ट्रातील सर्वात मोठा कीर्तन महोत्सव म्हणून या सोहळ्याकडे आता पाहिले जात आहे. ( MLA Sunil Shelke Kirtan Festival Maval Taluka Kamshet )

इंदुरीकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन
पाच दिवसांच्या या कीर्तन महोत्सवाचा रविवारी (दि. ५ जानेवारी) शेवटचा दिवस आहे. प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे. श्री विठ्ठल परिवार मावळ आयोजित कीर्तन महोत्सव २०२५ च्या काल्याचे कीर्तन रविवार (दि. ५ जानेवारी २०२५) रोजी श्री विठ्ठल परिवार मावळ सप्ताह मैदान, कामशेत येथे होणार असल्याचे आयोजतांनी सांगितले आहे. ( Kirtan by Kirtankar Nivritti Maharaj Deshmukh Indurikar )

हरी नामाच्या गरजात मावळकर रंगले…
गेली चार दिवस राम कृष्ण हरीचा गजर आणि विठ्ठल नामाचा जयघोष मावळ तालुक्‍यातील कामशेत शहरात दुमत आहे. हजारोंच्या संख्येने वारकरी भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित राहत असून संपूर्ण मावळवासीय हरी नामाच्या नामघोषात रंगून गेले आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांसह विविध संताच्या अभंग ओव्यांच्या निरूपणाने मावळवासीयांचे कान तृप्त होत आहेत. भव्य व्यासपीठावरील श्री विठ्ठल रखुमाई यांच्या मूर्ती समोर आपोआपच हात जोडले जात आहे. तर संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या मूर्ती डोळ्याचे पारणे फेडीत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अत्यंत दिमाखात आहे. संत चरित्रातील देखावे लक्ष वेधून घेत आहेत. कीर्तन महोत्सवाने मावळकरांच्या नवीन वर्षाची सुरुवात भक्तीमय व प्रसन्न वातावरणात झाली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळवासियांना दिलासा द्यावा… वडगाव मावळ येथे कायमस्वरूपी उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी
– आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
– पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली, जितेंद्र डूडी नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू ; कोण आहेत जितेंद्र डूडी? जाणून घ्या


dainik maval jahirat

Previous Post

‘कष्ट केले तर चांगले फळ मिळतेच, सावित्रीबाई फुले यांनी कष्ट केले म्हणून आज आपण शिक्षण घेतोय’ – तृप्ती निंबळे

Next Post

शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्याचा प्रयत्न फसला ; साथीदारांकडून पिस्तुले, काडतुसे जप्त । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
An attempt to avenge Sharad Mohol murder failed Pistols cartridges seized from accomplices Pune

शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्याचा प्रयत्न फसला ; साथीदारांकडून पिस्तुले, काडतुसे जप्त । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.