Dainik Maval News : कार्ला येथील श्री एकविरा विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी शासकीय इंटरमिडीयट चित्रकला स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. शाळेतील एकूण 20 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यापैकी 5 विद्यार्थी अ श्रेणीमध्ये, 7 विद्यार्थी ब श्रेणीमध्ये आणी 8 विद्यार्थी हे क श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले असून स्पर्धेत विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे.
कला शिक्षिका सची दगडे यांनी स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या चित्रकला परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीनिहाय दहावीच्या परीक्षेत अतिरिक्त गुण मिळणार आहे. यामुळे विद्यार्थांच्या टक्केवारीत वाढ होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, इतर पदाधिकारी, मुख्याध्यापक संजय वंजारी यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ई-हक्क प्रणाली : वारस नोंद, 7/12 वरील इकरार नोंदी, मयताचे नाव कमी करणे यासाठी आता घरबसल्या जमा करा कागदपत्रे
– नैसर्गिक आपत्तीग्रस्त ५.३० लाख शेतकऱ्यांना ५३५ कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई ; थेट खात्यात जमा होणार रक्कम
– HSC Exam Hall Ticket : बारावी बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) ऑनलाईन उपलब्ध, असे करा डाउनलोड

