Dainik Maval News : दिग्रस येथील बहूचर्चित जनसंघर्ष अर्बन निधीतील मास्टरमाईंड प्रणीतसह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई एसआयटी व एलसीबी पथकाने लोणावळा येथे 14 जानेवारीला रात्री उशिरा केली. प्रणित देवानंद मोरे, देवानंद लक्ष्मण मोरे, प्रीतम देवानंद मोरे व जयश्री देवानंद मोरे अशी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत.
दिग्रस येथील जनसंघर्ष अर्बन निधी लि. च्या सात शाखेत 6 हजार 200 खातेदारांची 44 काेटींनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पाेलिसांनी साहील जयस्वाल व त्याच्या आईवडिलाला अटक केली होती. एकाची पोलिस कोठडी तर दोघांची न्यायालयीन कोठडी बुधवारी संपत असल्याने तिघांना दारव्हा न्यायालयात हजर केले गेले.
दरम्यान अपहारातील मुख्य सूत्रधार प्रणीत व त्याचे कुटुंब महिनाभरापासून पसार होते. तीन पोलिस पथकांकडून त्यांचा कसून शोध सुरू होता. आरोपी लोणावळा येथे असल्याची माहिती मिळताच पोलिस रवाना झाले. मंगळवारी रात्री उशिरा चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांवरील ‘संक्रात’ टळली ; ‘या’ गावांमधील शेतकऱ्यांना मिळाली मुदतवाढ
– मावळ तालुक्यातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला जोडण्यास विरोध । Maval News
– ‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’