व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

प्रा. वेदकुमार वेदालंकार यांना अभंग प्रतिष्ठानचा ‘जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ । Dehu News

श्रीक्षेत्र देहू येथील अभंग प्रतिष्ठान आयोजित गाथा चिंतन रौप्यमहोत्सव सोहळा व पुरस्कार वितरण सोहळा अतिशय भक्तीपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 31, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Dehu Abhang Pratishthan Jagadguru Shri Sant Tukaram Maharaj Award to Ved Kumar Vedalankar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : श्रीक्षेत्र देहू येथील अभंग प्रतिष्ठान आयोजित गाथा चिंतन रौप्यमहोत्सव सोहळा व पुरस्कार वितरण सोहळा अतिशय भक्तीपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. याप्रसंगी संत वाङ्मयाचे निष्ठावंत अनुवादक प्रा. वेदकुमार वेदालंकार यांना महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे सर व संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यासह “अभंगवारी” कार्यक्रमाचे प्रमुख निर्माते व विश्व वारकरी सेवा संस्थेचे अध्यक्ष संदीप जिवलग कोहळे व फेसबुक दिंडीचे प्रवर्तक स्वप्निल रामभाऊ मोरे व फेसबुक दिंडी टीम यांस तपोनिधी श्री संत नारायण महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त शिवाजी महाराज मोरे, संत साहित्याचे अभ्यासक व गाथा चिंतनचे निरूपणकार सचिनदादा पवार, देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पूजाताई दिवटे, देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, अभंग अक्षरे फेसबुक पेजचे प्रवर्तक, चित्रकार प्रकाश पाटील, ज्येष्ठ पत्रकार श्रीरंग गायकवाड, संगीत देव बाभळीचे संगीतकार आनंद ओक, अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश गाडे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमासाठी देहू पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद दिला.

गाथा चिंतन हा उपक्रम गेल्या दोन वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी याप्रमाणे श्रीक्षेत्र देहू मध्ये अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित केला जातो. या गाथा चिंतनातून संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे साध्या सोप्या भाषेत निरूपण केले जाते. गाथा चिंतन २५ वे सत्र मोठ्या भक्तीमय महोत्सवात ह.भ.प. सचिनदादा पवार यांच्या प्रासादिक वाणीतून संपन्न झाले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळच्या राजकारणात भूकंप ! विधानसभा निवडणुकीत सुनिल शेळकेंविरोधात प्रचार केल्यामुळे राष्ट्रवादीच्या आठ दिग्गज नेत्यांचे पक्षातून निलंबन
– पुणे, शिवाजीनगर, चिंचवड, देहूरोड, तळेगाव, कामशेत व लोणावळा स्थानकांवर थांबणाऱ्या जलद लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी
– वडगावची भूमी केवळ मराठा साम्राज्याचे नव्हे तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक ; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन


Previous Post

दादांचा आण्णांवर भारी जीव ! राष्ट्रवादीच्या सर्व आमदार खासदारांमधून सुनिल शेळके यांचीच ‘डीपीडीसी’वर ‘नामनिर्देशित’ म्हणून नियुक्ती

Next Post

पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune District Planning Committee meeting concluded under chairmanship of DCM Ajit Pawar

पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 9, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
Agricultural Service Center supplying seeds fertilizers through Maval Taluka kharedi vikri sangh

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

June 9, 2026
Two underpasses approved between Kendriya Vidyalaya and Dehuroad Ordnance Factory on Dehuroad-Nigdi road

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

June 9, 2026
Lonari Samaj Seva Sangh felicitates meritorious students of 10th and 12th in Dehu

देहू येथे लोणारी समाज सेवा संघातर्फे दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.