व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अवैधरित्या पेट्रोल-रॉकेल विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले ! कामशेतमध्ये पेट्रोल व रॉकेलचा अवैध साठा जप्त । Kamshet News

लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या आणखीन एका कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 1, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Illegal stock of petrol and kerosene seized in Kamshet By Police ips satya sai karthik

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या आणखीन एका कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कामशेत येथे गुरुवारी (दि.30) पोलिसांनी धडक कारवाई करीत टाकलेल्या छाप्यात तब्बल 740 लीटर पेट्रोल आणि 105 लीटर रॉकेलचा साठा जप्त करण्यात आला आहे.

कामशेत येथील गदीया कॉम्प्लेक्समध्ये एका खोलीत ज्वलनशील पदार्थांचा अवैध साठा करून ठेवल्याची गोपनीय माहिती आयपीएस सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. त्यांनी या माहितीच्या आधारे छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश कामशेत पोलिसांना दिले होते. त्यानुसार गुरुवारी कामशेत पोलिसांच्या पथकानी सदर ठिकाणी छापा टाकला. तेव्हा सुभाष रतनचंद गदिया (रा. कामशेत) याने गदिया कॉम्प्लेक्समधील एका खोलीत पेट्रोल सदृश्य आणि रॉकेल सदृश्य ज्वलनशील द्रव्य पदार्थांचा अवैध साठा करून ठेवल्याचे आढळून आले.

  • पोलिसांनी आठ बॅरलमधून 740 लीटर पेट्रोल आणि 105 लीटर रॉकेल चा साठा जप्त केला असून एकूण 80 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आरोपी सुभाष रतनचंद गदिया याच्यावर कामशेत पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 2023 च्या कलम 287 सह अत्यावश्यक वस्तू अधिनयम सन 1955 चे कलम 3,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक रविंद्र पाटील, पोलीस निरिक्षक दत्तात्रय शेडगे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक नितेंद्र कदम, पोलीस अंमलदार समिर करे, पोलीस कॉन्स्टेबल माळवे, गारगोटे, ठाकूर, रविंद्र राऊळ, तहसील कार्यालय वडगाव मावळ येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी तुषार तनपुरे व पुरवठा निरिक्षक संदीप तनपुरे यांच्या समक्ष करण्यात आली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता
– तळेगाव शहर हादरले ! भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी युवकाची हत्या । Murder in Talegaon Dabhade City


Previous Post

मुंबई-पुणे महामार्गावर पार्क केलेल्या टँकरमधून रॉकेल चोरणाऱ्यांना रंगेहात अटक ; वडगाव मावळ पोलिसांची कारवाई

Next Post

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘जीबीएस’चा पहिला बळी, पिंपळे गुरव येथील ओला-उबेर चालकाचा मृत्यू । Pimpri-Chinchwad

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
GBS disease

पिंपरी-चिंचवडमध्ये 'जीबीएस'चा पहिला बळी, पिंपळे गुरव येथील ओला-उबेर चालकाचा मृत्यू । Pimpri-Chinchwad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 9, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
Agricultural Service Center supplying seeds fertilizers through Maval Taluka kharedi vikri sangh

मावळ खरेदी-विक्री संघ ३५ वर्षांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत; ‘संपूर्ण तालुक्याला संघाकडून बियाणे, खतांचा पुरवठा होईल’ – आमदार सुनील शेळके

June 9, 2026
Two underpasses approved between Kendriya Vidyalaya and Dehuroad Ordnance Factory on Dehuroad-Nigdi road

देहूरोड-निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर

June 9, 2026
Lonari Samaj Seva Sangh felicitates meritorious students of 10th and 12th in Dehu

देहू येथे लोणारी समाज सेवा संघातर्फे दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.