Dainik Maval News : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोनचा तालुकास्तरीय निकाल जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मावळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी दिली.
गटशिक्षणाधिकारी वाळुंज यांनी या उपक्रमाबाबत सांगितले की, मागील वर्षी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रम सुरू झाला. त्यात मावळ तालुक्यातील अनेक शासकीय व खासगी शाळांनी सहभाग घेतला. दोन्ही गटांत प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे तीन लाख रुपये, दोन लाख रुपये व एक लाख रुपये अशी बक्षीसे मिळाली होती.
यावर्षी त्याच स्पर्धेचा टप्पा क्रमांक दोनसाठी शासकीय व खासगी गटात मोठ्या प्रमाणावर तयारी करून शाळांनी सहभाग घेतला होता. अनेक उपक्रमही राबविण्यात आले. या दोन्ही गटांतील शाळांची तपासणी पथकामार्फत निकषनिहाय तपासणी करण्यात आली. निकाल संकलन करून शासकीय गटातून तीन व खासगी गटातून तीन अशा सहा शाळा निवडल्या गेल्या.
या निमित्ताने प्रत्येक शाळेत निकषनिहाय राबविण्यात आलेले उपक्रम, रेकॉर्ड रजिस्टर अद्ययावत झाले. परसबाग, क्रीडा, स्पर्धा परीक्षा, शालेय पोषण आहार आदी सर्व बाबींची सखोल पाहणी व तपासणी करून तालुकास्तरावरून शासकीय व खासगी गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय अशा प्रत्येकी तीन शाळांची निवड करून निकाल जाहीर करण्यात आला.
तालुक्यात क्रमांक मिळविलेल्या शाळांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तपासणी होणार असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी दिली.
विजेत्या शाळा –
शासकीय शाळा : प्रथम – जिल्हा परिषद शाळा धामणे, द्वितीय – जिल्हा परिषद शाळा सांगवडे, तृतीय- संत ज्ञानेथवर विद्यालय, तळेगाव दाभाडे.
खासगी शाळा : प्रथम- पवना विद्यामंदिर पवनानगर, द्वितीय- एकवीरा विद्यामंदिर कार्ला, तृतीय- ग्राम प्रबोधिनी विद्यालय साळुंब्रे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश