Dainik Maval News : श्री गजानन महाराज प्रकट दिन माघ वद्य सप्तमी निमित्त (दि.20) तळेगाव दाभाडे आणि स्टेशन परिसरात श्री गजानन विजय ग्रंथाच्या पारायणासह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
संत तुकारामनगर येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात मागील आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांची गुरुवारी सांगता झाली. शेकडो भक्तांनी अथर्वशीर्ष पठण केले. गजानन विजय ग्रंथाचे पठण करण्यात आले. मंदिर आणि महाराजांच्या मूर्तीसह श्री राम, लक्ष्मण, सीतेच्या मूर्तीचीही आकर्षक सजावट करण्यात आली होती. दिवसभर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. भक्तांना दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
- यशवंतनगरातील तपोधाम कॉलनीतील यशोधाम हॉलमध्ये सालाबादप्रमाणे कै.आपटे आजी संस्थापित ‘एक आनंद सोहळा’ अर्थात श्री गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कृष्णकुंज इमारतीमध्ये गजानन विजय ग्रंथाचे पारायण करण्यात आले. सकाळी काकड आरती, अभिषेक, पूजा आणि आरतीने प्रकटदिनाची सुरुवात झाली.
दुपारी संजीवनी पाटील यांचे कीर्तन झाले. गजानन महाराज शेगाव वारकरी संस्था, डोळसनाथ जोगेश्वरी भजनी मंडळाने दिवसभर भजनसेवा दिली. सायंकाळी रसिक मनमोहिनी’ हा गीतगायन कार्यक्रम झाला. दिवसभर महाप्रसाद, रात्री नऊ वाजता आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश