Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील जुना जकात नाका येथे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली.
अभिषेक तिक्क्या रेड्डी (वय २५, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह साबीर शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार मोहसीन अत्तार यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील जुना जकात नाका येथे एक तरुण पिस्तूल घेऊन आल्याची माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अभिषेक याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे एक पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे आढळून आली. त्याला हे पिस्तूल साबीर शेख याने दिले असल्याने त्याच्या विरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश