Dainik Maval News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज, शनिवारी (दि.22) पुणे दौऱ्यावर येत आहेत. गृहमंत्री शाह यांच्या उपस्थितीत व हस्ते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनच्या लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र वाटण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेता म्हाळुंगे गाव, बालेवाडी येथील वाहतुकीत शनिवारी (दि.22) दुपारी बारा ते रात्री आठ वाजेपर्यंत बदल करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बालेवाडी येथे होणार्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र तसेच काही लाभार्थ्यांना या योजनेचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांची सुरक्षा व कार्यकमाला होणारी गर्दी लक्षात घेता म्हाळुंगे आणि बालेवाडी परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.
वाहतूक मार्गातील बदल
हिंजवडी वाहतूक विभाग
चांदे-नांदे-म्हाळुंगे गाव ते राधा चौक व राधा चौक ते म्हाळुंगे गाव येण्या-जाण्यास सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग :
1) चांदे-नांदे येथून येणारी जड अवजड वाहने ही गोदरेज सर्कल येथून डावीकडे वळून माण मार्गे हिंजवडी मार्गे इच्छित स्थळी जातील.
2) बालेवाडी जकात नाका व बाणेर हद्दीतुन येणारी जड अवजड वाहने ही राधा चौकातुन उजवीकडे वळून वाकड नाका मार्गे हिंजवडी मार्गे इच्छित स्थळी जातील.
3) सुस ब्रिज कडुन राष्ट्रीय महामार्गावरुन न्याती शोरूम समोरील पंक्चर येथुन राधा चौकाकडे येणारी जड अवजड वाहने ही बैंगलोर-मुंबई हायवेने वाकड नाका मार्गे हिंजवडी मार्गे इच्छित स्थळी जातील.
बालेवाडी स्टेडीयम म्हाळुंगे कडील मेनगेट समोरील रस्ता हा शितळाई देवी चौक (पुणेरी स्वीट) ते म्हाळुंगे पोलीस चौकी पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील.
पर्यायी मार्ग
1) चांदे- नांदे व म्हाळुंगे गावातुन राधा चौकाकडे जाणारी वाहने ही शितळाईदेवी चौक (पुणेरीस्वीट) येथून उजवीकडे वळून म्हाळुंगे पोलीसचौकी येथून पुढे राधा चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
2) राधा चौकातून म्हाळुंगे गावाकडे जाणारी वाहने ही म्हाळुंगे पोलीस चौकी येथे डावीकडे वळून पुढे म्हाळुंगे गाव, चांदे नांदे व पुढे इच्छित स्थळी जातील.
राधा चौक ते मुळा नदी ब्रिजपर्यंत सर्व्हिस रोडवर (कार्यक्रमास येणारी वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहने सातारा मुंबई महामार्गाचे मुख्य रस्त्याने इच्छित स्थळी जातील.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश