Dainik Maval News : उन्हाची तीव्रता वाढल्याने ऊसतोड कामगारांच्या मुलांना सावलीसाठी झोपड्या सोडून झाडांच्या सावलीचा आधार घ्यावा लागत आहे. गेल्या महिनाभरापासून वातावरणातील तापमान दरवर्षीपेक्षा अधिक वाढले असून सध्या तापमानाने 38 अंशाचा पारा ओलांडला आहे. वाढत्या तापमानाची सर्वाधिक झळ ऊसतोड कामगारांच्या झोपड्यात राहणाऱ्या मुलांना सहन करावी लागत आहे.
साखर कारखान्याचा ऊसतोड हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, लवकरच तो बंद होणार आहे. त्यामुळे सध्या शिल्लक असलेल्या उसाची तोडणी करण्यासाठी कामगारांची धावपळ सुरू असून, उन्हाची तीव्रता वाढण्याआधीच उसाची तोडणी पूर्ण करण्यासाठी कामगार पहाटे लवकर उठून शेतावर जातात. त्यामुळे झोपड्यात फक्त लहान मुले असतात.
ऊसतोड कामगारांच्या या झोपड्या आकाराने लहान असून, वाढत्या तापमानाने झोपड्यांच्या आत मुलांना गुदमरल्यासारखे होत असल्याने ऊसतोड कामगारांच्या मुलांना सावलीसाठी मिळेल त्या झाडांच्या किंवा कारखान्याच्या परिसरातील बागेतील झाडांच्या सावलीचा आधार घ्यावा लागतो.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– एमपीएससी परीक्षा यावर्षीपासून यूपीएससीच्या धर्तीवर होणार ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– ‘मावळात पर्यटन व्यवसाय वेगाने विकसित होतोय, स्थानिक तरूणांनी शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक प्रगती साधावी’
– जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांना 2028 पर्यंत मुदतवाढ – पाणीपुरवठा मंत्री
