मावळ तालुका ( Maval Taluka ) खादी ग्रामोद्योग संघावर ( Khadi Gramodyog Sangh ) भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महायुतीच्या कांचन नारायण भालेराव ( Kanchan Bhalerao ) यांची चेअरमनपदी निवड झाली आहे. तर, अमित ओव्हाळ यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे. खादी ग्रामोद्योग संघावर मागील 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस ( Nationalist Congress Party ) यांची सत्ता होती. परंतून आता महायुतीच्या सदस्यांनी वर्चस्व निर्माण केले आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, पश्चिम महाराष्ट्र आरपीआय (A) प्रमुख सूर्यकांत वाघमारे, भाजपा प्रभारी भास्कर म्हाळसकर, भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. ( Maval Taluka Khadi Gramodyog Sangh Kanchan Bhalerao Elected as Chairman )
मावळ तालुका आर.पी.आय. (आठवले) अध्यक्ष नारायण भालेराव, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, आर.पी.आय. (A) युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष समीर जाधव, खादी ग्रामोद्योग संचालक पत्रकार सुदेश गिरमे, गणेश भांगरे, सूरज बुटाला, कल्पना कांबळे, शहराध्यक्ष अनंता कुडे यांच्यासह भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे तसेच वडगाव नगरीचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– कोंडिवडे येथून अपहरण झालेल्या मुलीची उत्तराखंडमधून सुटका, वाचा सुटकेचा थरारक अनुभव
– शिवसेनेचे नवीन संपर्कप्रमुख जाहीर, पश्चिम महाराष्ट्राच्या संपर्कप्रमुखपदी ‘यांची’ नियुक्ती