Dainik Maval News : पर्जन्यमान चांगले असल्याने मावळ तालुक्यात शक्यतो चाऱ्याची कमतरता भासत नाही. परंतु, यावर्षी तालुक्यात चारा टंचाईचे संकट भेडसावू लागले आहे. ओला चारा, सुका चारा अपेक्षित प्रमाणात नसून त्याची कमतरता भासू लागल्याने, तसेच पशूखाद्य महागल्याने दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
ऊसतोड हंगाम संपत आला असून साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जवळपास समाप्त झाला आहे. त्यामुळे जनावरांना मिळणारे उसाचे वाढे कमी झाले आहेत. त्यामुळे ओला चारा मिळत नाही, त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होत आहे.
मावळ तालुक्यात रब्बीचे क्षेत्र तितकेसे नाही, त्यामुळे याकाळात शेतीतून जनावरांसाठी हवे तितके खाद्य मिळत नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय हा बहुतांश शेतीवर अवलंबून असल्याने चाऱ्याअभावी पशूपालक चिंतेत आहेत
यंदा पावसाने चांगली हजेरी लावली होती. परंतु परतीच्या व अवकाळी पावसाने गवताची पाहिजे तितकी वाढ झाली नाही. यामुळे सध्या रब्बी पिकांची काढणी, मळणी सुरू असून त्यातून पशूधनासाठी खाद्याची तजवीज शेतकरी करीत आहे.
गवताचे महत्त्व वाढले असून गवत ७ ते ८ हजार रुपये शेकडा दराने विकले जात आहे. तर शाळू कडवा ३ ते ४ हजार रुपये शेकडा झाला आहे. हे दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हावा ; शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा – आमदार सुनिल शेळके
– मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भुईकोट किल्ल्यावर 61 फुटी भगव्या ध्वजाचे लोकार्पण । Maval News
– मोठी बातमी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे यांची निवड ; चुरशीची लढतीत 63 मतांनी विजयी । Dehu News