वडगाव मावळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील एकाच बाकावर बसलेले आणि भविष्याची वाटचाल करताना आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वाटेने गेलेले शालेय जीवनातील सवंगडी स्नेहसंमेलन मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल पंचवीस वर्षांनी एकत्र आले. शिक्षकांप्रती असलेली आदरयुक्त भीती अद्यापही चेहऱ्यावर कायम ठेवत उत्साह, आनंद आणि कौतुकाची भावना मनात ठेवत न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मैत्रिचा रौप्य महोत्सव रंगला. ( Alumni Get Together In New English School At Vadgaon Maval )
सन 1996 मधील न्यू इंग्लिश स्कूलमधील माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचा स्नेह मेळावा रविवारी 26 नोव्हेंबर रोजी नुकताच संपन्न झाला. मेळाव्यादरम्यान विद्यार्थ्याच्या निमंत्रणास मान देत तत्कालीन शिक्षक ए. डी. निकम, वाय. एन. अहीरे, रामचंद्र काटवटे, पी. एम.शेख, एस. व्ही. उबाळे, शिक्षिका व्ही.आर. काटवटे, एस.एम. सुर्यवंशी, रेखा पाटील-इंगळे, शिक्षकेतर कर्मचारी मधुकर वाघवले, वनराज ढोरे, लोंढे मामा, भोयरे येथील न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य आत्माराम मोरे आदींनी उपस्थिती लावले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सन 1996 मधील इयत्ता दहावीच्या बॅचचे जवळपास 72 विद्यार्थांनी कार्यक्रमास हजेरी लावली. प्रथम शाळेतील हयात नसलेले माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांनंतर माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करत त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. पंचवीस वर्षांनी एकमेकांना भेटणाऱ्या मित्राच्या चेहऱ्यावर उत्सुकता, आनंद, मस्ती अशा संमिश्र भावना होत्या.
समीर सय्यद, अनिल ढोरे, किरण म्हाळसकर, अनंता कुडे, दीपक भालेराव, भाऊ म्हाळसकर, स्वप्नील जाधव, दशरथ जांभुळकर, नामदेव वारिंगे, मनिषा वाघमारे, विजया हवालदार, रेखा ओव्हाळ, रुपाली शिंदे आदी माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने हा स्नेहमेळावा संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. सामाजिक बांधिलकी जपत असताना शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले, तसेच शालेय कमानीचे रंगकाम करून नूतनीकरण केले. ( Alumni Get Together In New English School At Vadgaon Maval )
हेही वाचा – खळबळजनक! वडगाव मावळमधील दुय्यम निबंधक कार्यालयात आत्म’हत्येचा प्रयत्न
आपल्या निवृत्तीनंतरही अहीरे सर यांनी विद्यार्थांना समाजामध्ये कसे राहावे, कसे वागावे याचे धडे दिले. शेख सर यांनी गायलेल्या ‘सजन रे झुठ मत बोलो…खुदा के पास जाना हे’ या गाण्याला विद्यार्थ्यांसह सहकारी शिक्षकांनीही दाद दिली. काटवटे सर, उबाळे सर, सुर्यवंशी मॅडम, पाटील मॅडम यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. सुधीर कुंभार, बी.एम. सरकाळे, शोभा ढमढेरे या शिक्षकांनी कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थिती लावत विद्यार्थ्यांना आशिर्वाद दिले.
पंचवीस वर्षांनी भेटलेल्या मित्र-मैत्रिणींनी यापूढेही संपर्कात राहत गरजेनुसार शाळेस आवश्यक ती मदत करण्याचे मनोदय व्यक्त केला. शाळा भेट उपक्रमातंर्गत विद्यालयाचा नामफलक रंगरंगोटी व शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण केल्यामुळे सध्या शाळेमध्ये असलेल्या मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ( Alumni Get Together In New English School At Vadgaon Maval )
अधिक वाचा –
– व्हिडिओ – अग्निप्रलयापासून थोडक्यात वाचले र. वा. दिघे वाचनालय, वाचा थरार । Khopoli News
– सामाजिक भान जपणारा कृतिशील लेखक हरपला, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे 74व्या वर्षी दुःखद निधन । Nagnath Kotapalle Died
– मोठी बातमी! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी गुडन्यूज, जाणून घ्या