Dainik Maval News : कासारसाई-दारूंब्रे येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक बुधवारी (दि. 16 एप्रिल) कासारसाई येथील कारखाना सभागृहात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली.
निवडणूक कार्यक्रम जाहीर –
निवडणुकीसाठीचा कार्यक्रम प्रसिद्ध कऱण्यात आला असून दुपारी 1 ते 1:30 या वेळेत नामनिर्देशन पत्र वाटप व स्विकृती, 1:30 ते 2 या वेळेत छाननी, 2 वाजता वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध, त्यानंतर 2 ते 2:30 या वेळेत नामनिर्देशन पत्र माघार घेता येणार आहे. दुपारी 2:30 वाजता अंतिम यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर लगेचच 2:30 ते 3 या वेळेत मतदान आणि 3 ते 3: 30 वा.दरम्यान मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. यानंतर तत्काळ अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या नावांची घोषणा करण्यात येईल.
शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व –
कारखान्याच्या इतिहासात प्रथमच संचालक मंडळासाठी निवडणूक झाल्यानंतर आता होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान कारखान्यावर संस्थापक-अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनेलचे एकहाती वर्चस्व असले तरीही निवडणूकीतील काही जागा बिनविरोध होताना उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या आमदारांचे वर्चस्व दिसून आले.
उपाध्यक्ष पदाची सर्वाधिक चर्चा –
तसेच कारखान्यात अनेक संचालक नव्याने निवडून आलेले असल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाबाबत अनेक चर्चा होत आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान कारखान्याचे अध्यक्ष हे विदुरा उर्फ नानासाहेब नवले बनतील, अशी चर्चा असून उपाध्यक्षपदासाठी मात्र रस्सीखेच होऊ शकते असे सांगितले जात आहे.
संत तुकाराम साखर कारखाना संचालक (एकूण 21)
ऊस उत्पादक गट क्र. १ (हिंजवडी ताथवडे)
1. नानासाहेब नवले
2. दत्तात्रय जाधव
3. चेतन भुजबळ
ऊस उत्पादक गट क्र. २ (पौड-पिरंगुट)
4. ढमाले धैर्यशील रमेशचंद्र (बेलावडे, ता. मुळशी)
5. गायकवाड यशवंत सत्तू (नाणेगाव, पो. कुळे, ता. मुळशी)
6. उभे दत्तात्रय शंकर (कोळावडे, ता. मुळशी)
ऊस उत्पादक गट क्र. ३ (तळेगाव-वडगाव)
7. दाभाडे ज्ञानेश्वर सावळेराम (माळवाडी, पो. इंदोरी, ता. मावळ)
8. भेगडे बापूसाहेब जयवंतराव (तळेगाव दाभाडे, ता. मावळ)
9. काशिद संदीप ज्ञानेश्वर (इंदोरी, ता. मावळ)
ऊस उत्पादक गट क्र. ४ (सोमाटणे-पवनानगर)
10. कडू छबुराव रामचंद्र (पाचाणे, पो. चांदखेड, ता. मावळ)
11. लिम्हण भरत मच्छिंद्र (सांगवडे, पो. साळुंब्रे, ता. मावळ)
12. बोडके उमेश बाळू उर्फ बाळासाहेब (गहुंजे, पो. देहूरोड, ता. मुळशी)
ऊस उत्पादक गट क्र. ५ (खेड-शिरूर-हवेली)
13. लोखंडे अनिल किसन (मरकळ, ता. खेड)
14. भोंडवे धोंडिबा तुकाराम (शिंदे वस्ती, रावेत, ता. हवेली)
15. कोतोरे विलास रामचंद्र (चिंबळी, ता. खेड)
16. काळजे अतुल अरुण (काळजेवाडी, चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली)
महिला राखीव
17. अरगडे ज्योती केशव (काळुस, ता. खेड)
18. वाघोले शोभा गोरक्षनाथ (दारुंब्रे, पो. साळुंब्रे, ता. मावळ)
अनुसूचित जाती-जमाती
19. भालेराव लक्ष्मण शंकर (काले, पो. पवनानगर, ता. मावळ)
इतर मागासवर्ग
20. कुदळे राजेंद्र महादेव (सुभाषनगर, शुक्रवार पेठ, पुणे)
विमुक्त जाती/भटक्या जमाती
21. कोळेकर शिवाजी हरिभाऊ (कोयाळी तर्फे चाकण, ता. खेड)
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट ; पाहा रेल्वे स्थानकांची यादी व मंजूर निधी
– सोमाटणे फाटा येथील कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएच्या जागेत रस्त्यांचे रुंदीकरण करावे – खासदार श्रीरंग बारणे
– ना दाखला ना कुठली सेवा मिळणार ; थकबाकीदारांवर वडगाव नगरपंचायत करणार कठोर कारवाई । Vadgaon Maval