Dainik Maval News : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानच्या या वृत्तीला ठेचलेच पाहिजे, अशा प्रकारच्या भावना सर्वच स्तरातून उमटत आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही इतर देशांकडून भारताच्या पाठीशी ठाम असल्याची भूमिका मांडण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात वडगाव येथे सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरिक यांच्या वतीने मशाल रॅली काढण्यात आली.
श्री पोटोबा महाराज मंदिर ते पंचायत समिती चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली. रॅलीत दहशतवाद, पाकिस्तान विरोधी घोेषणाबाजी करण्यात आली. तसेच, हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करण्यात आली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार