Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत कार्यालयाच्या आवारात वाहन मालक किंवा चालक यांच्या जबाबदारीवर अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी तडजोड शुल्क, मोटार वाहन कर, पर्यावरण कर भरुन लिलावाच्या तारखेपर्यंत सोडवून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी अटकावून ठेवलेल्यांपैकी 148 वाहनांच्या प्रकरणांमध्ये वाहन मालक, चालक किंवा वित्तदात्यांनी कार्यालयाशी संपर्क साधून वाहने सोडवून घ्यावीत. या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया बुधवार, 30 एप्रिल आणि शुक्रवार, 2 मे 2025 होणार आहे. या वाहनांची यादी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, संत नगर, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड कार्यालय आणि तळेगाव व राजगुरुनगर (खेड) एसटी आगाराच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केलेली आहे.
अधिक माहितीकरीता https://eauction.gov.in आणि www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, संत नगर, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड 020-27232828 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार