व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दूधात होणारी भेसळ रोखण्यासाठी समिती स्थापन ; दूधात भेसळ करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन । Pune News

पुणे जिल्ह्यातील दूध भेसळीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी शासन निर्णयानुसार अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 25, 2025
in पुणे, ग्रामीण, शहर
milk

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील दूध भेसळीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी शासन निर्णयानुसार अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये अपर पोलीस अधिक्षक, पुणे, सहायक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त,पुणे, उप नियत्रंक वैध मापन शास्त्र पुण हे सदस्य तर जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी हे सदस्य सचिव असतील. दूधात भेसळ करणाऱ्या व्यक्ती, डेअरी याची माहिती समितीकडे देण्यात यावी असे आवाहन समितीने प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

दूध आपल्या दैनंदिन आहाराचा एक आवश्यक भाग असल्याने महत्वपूर्ण पोषक तत्वांचा स्रोत असून चांगले आरोग्य राखण्यास महत्वपुर्ण भूमिका बजावते. तथापि हाणीकारक पदार्थांसह दुधात भेसळ केल्याने ग्राहकांच्या हिताला मोठा धोका निर्माण होतो. दुध भेसळीच्या सामान्य प्रकारामध्ये पाणी, क्रीम मिल्क पावडर, वनस्पती तेल, स्टार्च, युरिया, डिटर्जंटस आणि इतर रसायनांचा समावेश करतात. हे भेसळ करणारे केवळ दुधाच्या पौष्टीक मुल्याशी तडजोड करीत नाहीत. तर मानवी शारिरीक समस्या, पचन, अॅर्लजी आणि दीर्घकालीन अवयवांचे नुकसान या सारख्या गंभीर आरोग्य समस्या देखील होऊ शकतात. या समस्याचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी ग्राहक, सरकारी संस्था, दुग्ध उद्योगाचे भागधारक आणि नियामक संस्था यांनी एकत्रपणे काम करणे अत्यंत आवश्यक आहे.

  • जिल्ह्यातील दूध संकलन स्विकृती केंद्र, पुणे जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील तसेच परराज्यांतून येणाऱ्या दुधाचे नमुने तसेच सहकारी व खाजगी क्षेत्रातील दूध संकलन व प्रक्रिया केंद्रावरील (डेअरी) नमुने यांची तपासणीसाठी सहायक आयुक्त (अन), अन्न औषध प्रशासन विभाग, पुणे विभागाकडील अन्न सुरक्षा यांना दरमहा उद्दीष्ठ ठरवून देण्यांत आले आहे. दुध व दुग्धजन्य पदार्थ भेसळीत सहभागी असणा-या व्यक्ती, डेअरी विरोधात प्रथम खबरी अहवाल (FIR) नोंदवून भेसळ केल्याचेआढळून आलेल्या कसूरदारांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल.

दूध भेसळीबाबत माहिती देण्यासाठी 1800222365 हा टोल फ्री क्रमांक व EMAIL ID – FDAPUNE2019@GMAIL.COM वर तक्रार नोंदवावी. दूध भेसळीबाबत तक्रार, माहिती देण्याऱ्या व्यक्तींची माहिती पुर्णपणे गोपनिय ठेवण्यात येईल असेही समितीने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार


dainik maval jahirat

Previous Post

आरटीओने अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याची शेवटची संधी, वाहन मालकांना आवाहन…

Next Post

भरत भोते यांची महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Bharat Bhote appointed as Shivsena UBT Pune District Rural President of Maharashtra Transport Sena

भरत भोते यांची महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.