Dainik Maval News : गोळेवाडी (ता. मावळ) येथील एका खासगी कंपनीतून लॅपटॉप आणि संगणक चोरणाऱ्या परप्रांतीय कामगारास तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने तमिळनाडू राज्यात जाऊन अटक केली आहे. चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून मूळ मालकास परत देण्यात आला आहे.
फॅब्रीकेशन व्यावसायिक अर्जुन रामबाबू महतो (रा. एस. एम. हाईटस, इंद्रापुरी कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी १५ एप्रिल रोजी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात संगणक चोरी झाल्याबाबत फिर्याद दिली होती.
फिर्यादी यांची गोळेवाडी गावच्या हद्दीतील ए. एस. कन्स्ट्रक्शन कंपनी असून तिथे काम करणारा मूळचा तमिळनाडूचा कामगार आरोपी एस. प्रसाद (वय ३०, एक्झरबिया सोसायटी, आंबी, ता. मावळ) याने कंपनी मालक आणि इतर कामगारांच्या ऑफिसमधील दोन लॅपटॉप आणि एक डेस्कटॉप अशा एकूण ८५ हजार रुपयांच्या मालाची चोरी करून पळून गेला होता.
मालाच्या किमतीपेक्षा संगणकातील डाटा कंपनीच्या दृष्टीने महत्वाचा होता. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित जाधव यांच्या सूचनेप्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अनंत रावण, पोलीस नाईक डी. के. सातकर आणि व्ही. बी. शेरमाळे आदींचे पथक तमिळनाडूमध्ये गेले. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने मध्यरात्री एस. प्रसाद याला ताब्यात घेतले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा लोणावळा शहरात सर्वपक्षीयांकडून तीव्र निषेध । Lonavala News
– पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ वडगाव मावळ येथील सर्वपक्षीय मशाल रॅली । Vadgaon Maval
– कामशेतमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून पहलगाम येथील क्रूर हल्ल्याचा जाहीर निषेध । Kamshet News