Dainik Maval News : श्री एकविरा-जोगेश्वरी दुर्गापरमेश्वरी ट्रस्ट कार्ला यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात मावळ तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील बारा जोडपी विवाहबद्ध झाली. देवी दुर्गापरमेश्वरी मंदिर परिसरात झालेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर व हजारो वऱ्हाडी मंडळी आवर्जुन उपस्थित होती.
- ट्रस्टने आयोजित केलेल्या विवाह सोहळ्याचे हे तेरावे वर्ष होते. साखरपुड्याने विवाह सोहळ्यास सुरुवात झाली. यानंतर हळदीचा कार्यक्रम झाल्यावर ढोल ताशांच्या गजरात नवरदेवांची मिरवणूक काढण्यात आली. विवाहसोहळ्यातील प्रत्येक वधूस एकतोळा सोन्याचे मंगळसुत्र, कर्णफुले, पैंजण, जोडवी, नथनी आणि कन्यादान म्हणून संसारउपयोगी विविध वस्तू देण्यात आल्या. तर वधू आणि वराला साखरपुडा, हळदी समारंभ, लग्न यासाठी लागणारी कपडे देण्यात आली. विवाह सोहळ्यास आलेल्या सर्वांसाठी भोजनाची उत्तम सोय करण्यात आली होती.
या विवाह सोहळ्यास मावळचे आमदार सुनील शेळके, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, भाजपा नेते रवींद्र भेगडे, सरदार पाटील, सरपंच दिपाली हुलावळे, उपसरपंच अभिषेक जाधव भरत येवले, मारुती खांडभोर, मच्छिंद्र केदारी, गंगाताई कोकरे, पंढरीनाथ ढोरे, गणेश विनोदे, गणपत भानुसघरे, संजय कोकरे यांसह परिसरातील गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.
विवाहसोहळ्याचे संयोजन ट्रस्टचे संस्थापक भरत मोरे, दिपक हुलावळे, मिलिंद बोत्रे, अजय शिराली, विवाह सोहळा समिती अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे कार्याअध्यक्ष सुरेश कडु, कार्यप्रमुख सुरेश केदारी, उपाध्यक्ष मारुती देशमुख व सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी तसेच कार्ला ग्रामस्थ यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळमधील पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये दहशतवादी कैद? लेकीच्या रिल्समध्ये दोन दहशतवादी कैद झाल्याचा वडिलांचा दावा
– पवनाधरणाच्या जागेवर अवैध बांधकामे ; मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी । Pavana Dam
– लॅपटॉप, संगणक चोरणाऱ्या कामगारास तमिळनाडूमधून अटक, तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी । Maval Crime