Dainik Maval News : श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज कान्हे प्रशालेचे मुख्याध्यापक कैलास पारधी सर यांचा सेवापूर्ती निरोप समारंभ उत्साहात पार पडला. शाळेचे शालेय समिती अध्यक्ष यादवेंद्र खळदे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमासाठी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे संस्थेचे संचालक महेशभाई शहा उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी जि.प. प्राथमिक शाळा कान्हे शाळेचे शालेय समिती अध्यक्ष समीरभाऊ सातकर, ज्येष्ठ नागरिक बंडोबा सातकर, केंद्रप्रमुख काळे मॅडम उपस्थित होते. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेने तसेच श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज कान्हे शाळेने कैलास पारधी सरांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.
मानपत्राचे वाचन सविता चव्हाण यांनी केले. शाळेच्या वतीने पारधी सरांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. नू.म.वि प्र मंडळ संस्थेचे सचिव संतोषजी खांडगे तसेच संस्थेचे सर्व संचालक तसेच संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांनी सरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शांत राहूनही उत्तम प्रकारे काम करून घेता येते या शब्दात ज्येष्ठ संचालक महेशभाई शहा यांनी पारधी सरांना शुभेच्छा दिल्या.
निवृत्तीनंतरचा सर्व वेळ सरांनी त्यांच्या कुटुंबीयांसाठी द्यावा अशा शब्दात शाळेचे अध्यक्ष यादवेंद्र खळदे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संतोष हुलावळे, शिक्षक प्रतिनिधी रियाज तांबोळी, किरण गवारे, लक्ष्मण सातकर, राजेंद्र भालेकर, श्रद्धा तुपे, कविता ढोरे, सीमा ओव्हाळ, वनिता गायकवाड आणि सृष्टी कारंडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा मोहोळ यांनी केले. प्रास्ताविक सोमनाथ साळुंके आणि आभार वर्षा गुंड यांनी मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळमधील पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये दहशतवादी कैद? लेकीच्या रिल्समध्ये दोन दहशतवादी कैद झाल्याचा वडिलांचा दावा
– पवनाधरणाच्या जागेवर अवैध बांधकामे ; मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी । Pavana Dam
– लॅपटॉप, संगणक चोरणाऱ्या कामगारास तमिळनाडूमधून अटक, तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी । Maval Crime