व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, May 23, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी आणखीन जमिनीची आवश्यकता, अतिरिक्त जमिनीसाठी ‘या’ 32 गावांमध्ये होणार भूसंपादन । Pune Ring Road

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रिंग रोड संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 28, 2025
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Pune-Ring-Road

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रिंग रोड संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत ‘एमएसआरडीसी’चे सहसंचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह खेड, हवेली तालुक्यातील उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी रिंग रोड केला जात आहे. या रोडसाठी हवेली, पुरंदर, खेड, भोर, मावळ आणि मुळशी या तालुक्यातील गावांमधली जमीन संपादित करण्यात आली आहे.

nakshtra ads may 2025

याबाबत संपादनाचे निवाडे लवकर जाहीर करून संपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे निवाडे २५ एप्रिलपर्यंत पूर्ण करून येत्या पंधरा दिवसांत संपादन पूर्ण करण्यात येईल, असे हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांनी सांगितले आहे. आता रिंग रोडचे नऊ टप्प्यांच्या कामांचे कार्यादेशही देण्यात आले आहेत. ( Pune Ring Road Project Land acquisition to be done again in 32 villages for additional land )

tata tiago ads may 2025

  • रिंग रोडजवळ सेवा रस्ते, विविध सुविधा तयार करण्यासाठी अतिरिक्त जमीन आवश्यक आहे. त्याकरिता महामंडळाने जिल्हा प्रशासनाकडे अतिरिक्त जमिनीची मागणी असल्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला आहे. रिंग रोड साकारताना सेवा रस्ते, विविध सुविधांसाठी पूर्व आणि पश्चिम भागातील अनुक्रमे १० आणि २२ गावांमधील जमिनीचे अतिरिक्त संपादन करावे लागणार आहे.

एमएसआरडीसीने याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला असून लवकरच त्याची अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. याशिवाय पुरंदर तालुक्यातील चांबळी आणि हिवरे गावातील रिंग रोडची आखणी बदलल्याने दोन्ही गावांतील जमिनींचे संपादन केले जाणार आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ( Pune Ring Road Project Land acquisition to be done again in 32 villages for additional land )

आखणीमध्ये चांबळी गावाचा समावेश होता. चांबळी गावातील जमीन संपादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. आता रिंग रोडसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाल्याने चांबळी, हिवरे या गावातील शेतकऱ्यांनी जमीन देण्याची तयारी दाखविली आहे. मावळ तालुक्यातील चांदखेड, उर्से, परंदवाडी, कासार आंबोली, मुळशी तालुक्यातील मुठे, घोटावडे, कातवडी, भोरमधील खोपी, हवेलीतील रहाटवडे, बहुली या गावांमधील काही प्रमाणात अतिरिक्त जमीन आवश्यक आहे.

तसेच नानोली तर्फे आकुर्डी, वडगाव, सुदुंबरे, हवेली तालुक्यातील लोणीकंद, बिवरी, कोरेगाव मूळ, बकोरी, वळती या गावांचा समावेश आहे. पुरंदर तालुक्यातील पवारवाडी, गराडे, दिवे, चांबळी, सोनोरी, थापेवाडी, हिवरे या गावातील काही जमीन अतिरिक्त म्हणून संपादित केली जाणार आहे. खेड तालुक्यातील खालुंब्रे, कुरोळी, सोळे, निघोजे, धानोरे आणि भोरमधील शिवरे या गावांमधली जमीन घेण्याचा प्रस्तावात समावेश आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळमधील पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये दहशतवादी कैद? लेकीच्या रिल्समध्ये दोन दहशतवादी कैद झाल्याचा वडिलांचा दावा
– मंथन सामान्य ज्ञान परीक्षा : साते गावातील दोन विद्यार्थी केंद्रस्तरीय यादीत चमकले । Maval News
– पुणे जिल्हा नियोजन समिती बैठक : सर्व तालुक्यांना एकसारखा निधी दिला जाईल । Pune DPDC


dainik maval ads may 2025

Previous Post

वडगावच्या आठवडे बाजारात येणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांच्या ‘आधार’ची तपासणी करा ; सर्वपक्षीय प्रतिनिधींची मागणी । Vadgaon Maval

Next Post

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर उड्डाणपूल कधी होणार ? 7 वर्षांपासून 9 उड्डाणपुलांचा प्रस्ताव लालफितीत । Old Mumbai Pune Highway News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
old Mumbai Pune highway

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर उड्डाणपूल कधी होणार ? 7 वर्षांपासून 9 उड्डाणपुलांचा प्रस्ताव लालफितीत । Old Mumbai Pune Highway News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

Breaking News : मावळ तालुका हादरला ! चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या, आरोपी अटकेत । Vadgaon Maval Crime

May 23, 2025
Accident

मोठी बातमी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर औंढे गावाजवळ शिवशाही बसचा अपघात

May 23, 2025
Crime

प्रतिष्ठित कंपनीच्या नावाने बनावट कपडे विक्री करणाऱ्या तळेगावमधील सहा दुकानदारांवर पोलिसांची कारवाई । Talegaon Dabhade

May 23, 2025
Lonavala-Municipal-Council

पावसाळ्यापूर्वी लोणावळ्यातील नालेसफाई पूर्ण करा ; पोलीस, विद्युत विभागानेही कामांचे नियोजन करावे – देविदास कडू

May 23, 2025
Vaishnavi Hagawane Suicide Case

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण : फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अटक । Vaishnavi Hagawane Suicide Case

May 23, 2025
Talegaon Chakan Shikrapur Highway

मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road

May 23, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.