व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये माणुसकीचा झरा : एकजुटीने वाचवला एक जीव

घडलेली घटना - 2 मे 2025, सकाळी 7:45 वाजता

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 2, 2025
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Passengers on Indrayani Express save life of a railway passenger who had a heart attack

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आजच्या तंत्रज्ञानप्रधान, गतीमान आणि अनेकदा स्वार्थी वाटणाऱ्या जीवनशैलीमध्ये माणुसकी, आपुलकी आणि सहकार्याचे दाखले फारच कमी वेळा पाहायला मिळतात. मात्र, 2 मे 2025 रोजी इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये घडलेला एक प्रसंग हा त्या सगळ्याचा अपवाद ठरला — आणि खऱ्या अर्थाने समाजधर्म काय असतो, हे दाखवून दिलं.

Novel NIBR Ads

सकाळी साधारण 7:45 वाजता, इंद्रायणी एक्सप्रेसच्या D8 बोगीत असलेल्या एक प्रवासी, श्री. सुधीर (राहणार – मुलुंड) यांना कर्जत-लोणावळा दरम्यान अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या तब्येतीबाबतचा पहिला संदेश “इंद्रायणी पासधारक ग्रुप”वर 7:47 वाजता आला. हा संदेश पाहताच अनेकांनी त्वरित लक्ष दिलं. “D8 बोगीत पेशंट आहे, कृपया त्वरित मदत करा” या अलार्मने धावत्या रेल्वेतील D8-D9 मधील अनेक प्रवाशांना हलवून टाकलं.

  • 7:55 वाजता, लोणावळा स्थानक गाठायच्या आधीच लोणावळा स्थानकावरील प्रवाशांनी आणि ग्रुप सदस्यांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून आपत्कालीन मदतीची तयारी सुरू केली. या काळात बोगीत असलेल्या प्रवाशांनी श्री. सुधीर यांना तात्काळ प्राथमिक मदत देण्यास सुरुवात केली.

8:03 वाजता, इंद्रायणी एक्सप्रेस लोणावळा स्थानकात थांबली. तिथे आधीच तयार असलेल्या प्रवाशांनी (पासधारक ग्रुपचे सदस्य) कोणतीही वेळ न दवडता श्री. सुधीर यांना स्टेशनवरून सजगपणे “श्रद्धा हॉस्पिटल, लोणावळा” येथे हलवले.

  • या संपूर्ण मदतकार्यामध्ये देशमुख, मारुती, झुंजारराव, नितेश गायकवाड, सागर महाडीक, शिवदास केळकर, महेश हुंडारे आणि प्रणय अंभुरे आणि ज्या टीसी व डॉक्टरानी मदत केली आणि अन्य सहकारी मित्र यांचं विशेष योगदान होतं. यांच्यातील काहींनी हॉस्पिटलमध्ये थांबून तपासणीची खात्री केली, तर काहींनी उपचारानंतर श्री. सुधीर यांना त्यांच्या घरी, मुलुंड येथे कारने सुखरूप पोहोचवले.

संपूर्ण प्रसंगात माणुसकीचे खरे रूप दिसले. कुणाही अनोळखी व्यक्तीसाठी वेळ, ऊर्जा, संसाधन आणि काळजी देणारे प्रवासी म्हणजे समाजातले खरे हिरो. कोणतीही वैयक्तिक ओळख नसताना, केवळ एक मेसेज आणि सहवेदना यांच्या जोरावर त्यांनी एक जीव वाचवला.

हा केवळ एक अपघाती क्षण नव्हता, तर समाज म्हणून आपली सजगता, तत्परता आणि माणुसकीची खरी परीक्षा होती — आणि आपण ती उत्तमरीत्या पार केली. या नायकांना सलाम, आणि आपण सगळ्यांनी या प्रेरणादायी घटनेतून शिकावं — संकटाच्या क्षणी एकमेकांच्या मदतीला धावणं, हाच खरा समाजधर्म!

Novel NIBR Ads

– श्री. राहुल काळभोर, इंद्रायणी पासधारक कुंटुंब मेंबर

अधिक वाचा –
– 30 मे पर्यंत तळेगाव शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आढावा बैठकीत आमदार सुनील शेळके यांची सूचना । MLA Sunil Shelke
– लोणावळा शहरात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार, अनेक आजी-माजी पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल । Lonavala News
– मुंबई-पुणे मिसिंग लिंक : कुठलीही तडजोड न करता पुलाचे काम काळजीपूर्वक करण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश । Mumbai Pune Missing Link
– शिळींब गावात ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात ; कीर्तन सोहळ्याला आमदार सुनील शेळके यांची उपस्थिती । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

पाऊले चालती पंढरीची वाट… संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेलच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी सुहास गरूड । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Suhas Garud appointed as Pune District President of NCP Social Justice Cell

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेलच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी सुहास गरूड । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Entry ban for heavy vehicles in Lonavala

महत्वाची बातमी ! पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

June 13, 2026
Quality roads should be constructed under Mukhyamantri Baliraja Shet Panand Raste Yojana DCM Sunetra Pawar

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणार; शेतकऱ्यांना मिळणार दर्जेदार रस्ते

June 13, 2026
Ashadhi Palkhi Procession 2026 Best facilities should be provided for Warkaris DCMinister Sunetra Pawar

आषाढी पालखी सोहळा २०२६ : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

June 13, 2026
Crime

माळवाडी रोडवर असणारा आरओ वॉटर फिल्टर फोडून 10 हजारांची नाणी लंपास

June 13, 2026
Theft-News

कंपनीच्या स्टोअर रूम मधून हॅमर मशीन चोरी प्रकरणी कामगाराविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
Liquor stock and contraband worth over 1 crore seized on Mumbai-Pune Highway one person arrested

मुंबई-पुणे महामार्गावर सुमारे १ कोटीहून अधिकचा मद्यसाठा व मुद्देमाल जप्त, एकाला अटक ; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

June 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.