Dainik Maval News : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी फरार सासरा राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे याना स्वारगेट मधून अटक केली आहे. गेली सात दिवसांपासून हे दोघे फरार होते आणि पोलिसांच्या अनेक पथकांकडून त्यांचा शोध सुरू होता. ( Vaishnavi Hagawane Suicide Case )
गेल्या आठवड्यात राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. परंतु हे प्रकरण हुंडाबळीचे असल्याचे आता समोर आले आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार होते. पोलिसांनी वैष्णवीच्या पालकांच्या तक्रारीनंतर वैष्णवीचा पती शशांक आणि सासू, नणंद यांना आधीच अटक केली आहे. तर, मिळालेल्या माहितीनुसार आज (दि. 23 मे) पहाटे साडेपाचच्या सुमारास फरार सासरा आणि दीर दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना शोधण्यासाठी गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्याच्या एकूण आठ टीम त्यांच्या मागावर होत्या. या प्रकरणात पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हे स्वतः लक्ष ठेवून होते. प्रत्येक वेळी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा ठिकाण बदलत असल्याने त्यांना पकडणे अवघड होते. अखेर आज पहाटे स्वारगेट मधून बावधन पोलिसांनी त्यांना अटक केली असून ठाण्यात आणण्यात आले आहे. ( Vaishnavi Hagawane Suicide Case Absconding Rajendra Hagavane Sushil Hagavane arrested )
राजकीय नेत्यांकडून आश्वासन –
दरम्यान गुरुवारी (दि. 22 मे) दिवसभर राजकीय नेत्यांनी वैष्णवीचे पालक कस्पटे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कस्पटे कुटुंबाशी संवाद साधला होता. आरोपींना लवकर अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. अखेर फरार आरोपींनाही अटक झाली असून लवकर ह्या प्रकरणी न्याय मिळेल अशी आशा आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खरीप हंगाम तोंडावर, कृषी सहाय्यक संपावर ! बळीराजा आणि कृषी विभागातील संपर्क तुटला । Maval News
– तळेगाव आगारातून सुटणारी तळेगाव दाभाडे ते विलेपार्ले बस पुन्हा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade
– खादी ग्रामोद्योग संघ मावळ तालुक्यात ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना प्रभावीपणे राबविणार । Maval News
– जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांकडून एकाला बेदम मारहाण ; आंबळे गावातील घटना । Maval News