Dainik Maval News : २७ वर्षापूर्वी एकत्र शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाकावरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. पवनानगर येथील पवना विद्या मंदिरच्या १९९८/१९९९ सालच्या एसएससी बॅच च्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ निंबळे, दशरथ ढमढेरे, बबन तांबे, भगवान शिंदे,अंजली दौडे,प्रिती जंगले, कमल ढमढेरे महादेव थोरात,बलभीम भालेराव शिक्षक परिषदेचे अध्यक्ष राम कदमबांडे,भारत काळे आदी शिक्षक उपस्थित होते.
- स्नेहसंमेलनात माजी विद्यार्थी नवनाथ भालेसईन व मास्तर पडवळ यांनी आपल्या गायनाने या कार्यक्रमाची रंगत वाढवली. तर माजी विद्यार्थी यांच्या वतीने पवना विद्या मंदिरचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे यांना दहा हजार रुपये शाळेच्या विकासाला हातभार लावण्यासाठी देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी केक कापून स्नेह संमेलनाचा आनंद घेतला.
यावेळी गाण्यांच्या भेंड्या,गप्पा गोष्टी, विविध खेळ खेळत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते. सर्व माजी विद्यार्थी आज आप आपल्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. आपल्या यशस्वी आयुष्याचे श्रेय शिक्षकांचे आहे असे अनेक विद्यार्थ्यांनी याप्रसंगी सांगितले .
- कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन अजित कुंभार, गीता गांधी, रेखा गांधी, कविता कालेकर, वंदना काळे, गणेश ठाकर, सविता ठाकर, सुभाष दहिभाते, अनंता जाधव, मास्तर पडवळ, रामदास घारे, अंकुश कालेकर, भानुदास दहिभाते, अनिल निंबळे, बाळू कदम, रेखा काळे, पुष्पा ठाकर, लक्ष्मण ठाकर, कांता ठाकर, संतोष लोखंडे, संजय राठी, वैशाली गोसावी, दत्ता निबळे, संतोष लोखंडे, मोतीलाल बोहरा, कौशल्या रासनकर यांनी केले
कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी विद्यार्थी अजित कुंभार यांनी केले सूत्रसंचालन बाळासाहेब कदम(सर) यांनी केले. तर आभार गणेश ठाकर यांनी मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway
