व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील ‘ही’ शाळा तब्बल सात वर्षांनी उघडली, नक्की काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

पवनमावळ विभागातील ठाकुरसाई गावातील जिल्हा परिषदेची शाळा पुन्हा सुरू

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 17, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Zilla Parishad school in Thakursai village of Pawan Maval division reopens

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : सोमवारपासून (दि. १६ जून) राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशानुसार ‘शाळा प्रवेशोत्सव’ होऊन प्रत्येक शाळेची सुरूवात झाली. मावळ तालुक्यातही जिल्हा परिषदेच्या शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यातही पवन मावळ भागातील ठाकुरसाई गावातील शाळेसाठी आणि येथील ग्रामस्थांसाठी हा दिवस अत्यंत खास होता, याचे कारण तब्बल सात वर्षांनी येथील जिल्हा परिषद शाळेचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी खुले झाले.

ठाकुरसाई गावातील जिल्हा परिषदेची ही शाळा पटसंख्येअभावी बंद झाली होती. २०१८ सालापासून पटसंख्या पूर्ण नसल्याने शाळा बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर अगदी गतवर्षीपर्यंत शाळा बंद राहिली. अखेर मागील वर्षापासून पालकांनी, ग्रामस्थांनी आणि स्थानिक प्रतिनिधींनी पुढाकार घेतला. गावात शिक्षणाची गंगा सुरू राहावी यासाठी प्रयत्न केले. पटसंख्या पूर्ण करण्यासाठी पालकांना समजाविण्यात आले. तसेच शाळेची भौतिक स्थिती सुधारण्यात आली. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, आमदार सुनील शेळके यांचे विशेष सहकार्य लाभले.

सोमवारी, स्वतः गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्या उपस्थितीत शैक्षणिक वर्षाची सुरूवात म्हणून शाळेचे दरवाजे उघडण्यात आले आणि विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करून शाळा प्रवेशोत्सव पूर्ण करण्यात आला. ही शाळा सुरूच राहून यापुढे पटसंख्या अधिक वाढावी यासाठी शिक्षण विभागही आवश्यक ती मदत, कार्यवाही करेल, असे वाळुंज यांनी सांगितले.

दरम्यान पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी संदिप काळे, केंद्र प्रमुख सुनंदा दहितुले, सरपंच नारायण बोडके, उपसरपंच अरविंद रोकडे, दत्तात्रय ठाकर, प्रकाश ठाकर, रामचंद्र ठाकर, राजु ठाकर, मदन ठाकर, अमोल कारके, विकास ठाकर, गणपत गाडे, ग्रामसेविका नंदा बाबर, संगिता कालेकर, दिपाली ठाकर, सपना ठाकर, कविता ठाकर, निशा ठाकर, राजेश राऊत, नितीन वाघमारे, नवनाथ आडकर यांसह पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत रवि ठाकर यांनी केले, आभार संजय ठाकर यांनी मानले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतीकडून शहराचा प्रारूप विकास आराखडा (डीपी) प्रसिद्ध । Vadgaon Maval Nagar Panchayat
– प्रेमसंबंधातील वादातून प्रेयसीकडून तीस वर्षीय प्रियकराचा खून ; इंदोरी, मावळ येथील घटना । Maval Crime
– चांगली बातमी ! ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ; राज्य रस्ते परिवहन महामंडळ राबविणार विशेष मोहीम


Previous Post

वडगाव नगरपंचायतीकडून शहराचा प्रारूप विकास आराखडा (डीपी) प्रसिद्ध । Vadgaon Maval Nagar Panchayat

Next Post

द्रुतगती मार्गावर दोन कारची धडक, एकाचा मृत्यू, उर्से टोलनाक्याजवळील घटना । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Accident

द्रुतगती मार्गावर दोन कारची धडक, एकाचा मृत्यू, उर्से टोलनाक्याजवळील घटना । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.