व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कुंडमळा ठिकाणी दर्शक गॅलरी असणारा पूल उभारणार, अतिरिक्त निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कुंडमळा दुर्घटनास्थळी भेट ; मावळ रुग्णालयात जखमींची भेट घेऊन विचारपूस

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 18, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
DCM Ajit Pawar visits Kundamala accident site meets injured at Maval Hospital and inquires

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे साकव पूल पडून झालेल्या दुर्घटनेची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन घेतली. या ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यानंतर तातडीने सुरुवात करून लवकरात लवकर उभारणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, मावळचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकारी तसेच स्थानिकांकडून घटनेबाबत तसेच बचाव कार्याबाबत माहिती घेतली. तातडीने धाव घेऊन बचावकार्य केलेल्या स्थानिक नागरिकांना त्यांनी शाबासकी दिली.

यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना पवार म्हणाले, मावळ तालुक्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बचाव कार्यासाठी अत्याधुनिक वाहन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात येईल.

घटनेची चौकशी करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक अधिकारी, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता आदींसह निवासी उपजिल्हाधिकारी यांची समिती नेमली आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

अपघातग्रत पुलाचा उर्वरित सर्व भाग पाडण्यात येणार आहे. याशिवाय आयुष्य संपलेले तसेच स्ट्रक्चरल ऑडिटर्स यांनी वापरण्यास धोकादायक असा शेरा दिलेले इतरही सर्व धोकादायक पूल पाडण्यात येतील, असेही पवार म्हणाले.

  • नवीन पूल दर्शक गॅलरीसह बांधण्यात येणार
    या ठिकाणी साडेसात मीटर रुंदीचा पूल बांधण्यात येणार असून त्याच्या दोन्ही बाजूला ८ फुटाचे दोन पदपथ करण्यात येणार आहे. तसेच हे पर्यटन स्थळ असल्याने दोन दर्शक गॅलरी (व्यूविंग गॅलरी) करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पावसानंतर तातडीने पुलाच्या कामाला सुरुवात करावी, असे निर्देश यावेळी संबंधित बांधकाम कंत्राटदाराला दिले.

उपमुख्यमंत्र्यांकडून रुग्णालयात जखमींची विचारपूस
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवना रुग्णालयात जाऊन या दुर्घटनेतील जखमी रुग्णांची भेट घेतली. तसेच जखमींवर आवश्यक ते सर्व उपचार होतील याची काळजी घ्यावी असे डॉक्टरांना निर्देश दिले. या कामात समन्वयाची जबाबदारी प्रांताधिकाऱ्यांवर राहील, असेही ते म्हणाले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतीकडून शहराचा प्रारूप विकास आराखडा (डीपी) प्रसिद्ध । Vadgaon Maval Nagar Panchayat
– प्रेमसंबंधातील वादातून प्रेयसीकडून तीस वर्षीय प्रियकराचा खून ; इंदोरी, मावळ येथील घटना । Maval Crime
– चांगली बातमी ! ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ; राज्य रस्ते परिवहन महामंडळ राबविणार विशेष मोहीम


Previous Post

राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे थकीत कमिशन देण्याची कार्यवाही करावी – मंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश

Next Post

जिल्ह्यातील सर्व पुल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलकांची ७ दिवसात बांधकाम तपासणी करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
District Collector Jitendra Dudi reviewed the functioning of Pune District Disaster Management Authority

जिल्ह्यातील सर्व पुल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलकांची ७ दिवसात बांधकाम तपासणी करा - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
Big relief for Talegaon Dabhade residents regarding water issue Approval for reservation of water from Andhra Dam

तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी

April 16, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.