व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगरपंचायत निवडणूक : वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार निवडणूक । Vadgaon Nagar Panchayat

राज्य शासनाने प्रभाग रचना निश्चित करण्याचे आदेश दिल्यानंतर वडगाव नगरपंचायत प्रशासनाने त्याची तयारी सुरू केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 18, 2025
in लोकल, शहर
Vadgaon-Nagar-Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्य शासनाने प्रभाग रचना निश्चित करण्याचे आदेश दिल्यानंतर वडगाव नगरपंचायत प्रशासनाने त्याची तयारी सुरू केली आहे. १७ जूनपासून प्रारूप प्रभाग रचना प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आ.

  • राज्य शासनाच्या निर्देशानुसार वडगाव नगरपंचायतीत एक सदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार असून १७ प्रभागांसाठी १७ सदस्यांची निवड होणार आहे. प्रत्येक प्रभागातून एक सदस्य निवडला जाईल. नगराध्यक्ष पदासाठी मात्र थेट जनतेतून निवड होणार आहे. प्रस्तावित प्रभाग रचना व आरक्षणामध्ये काही बदल होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

राज्य शासनाने मंगळवारी नगरपंचायतींना प्रभाग रचनेसाठी जनगणना निकष निश्चित करून आदेश दिले. त्यानंतर वडगाव नगरपंचायत सज्ज झाली असून बैठकीद्वारे निवडणूक प्रक्रियेची आखणी सुरू झाली आहे.

राज्य निवडणूक आयोग किंवा प्राधिकृत अधिकारी मसुद्याला मंजुरी देतील. प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात येतील. प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी होऊन त्यानुसार अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाईल आणि ती निवडणूक आयोगाकडे पाठवली जाईल.

२०१८ मध्ये वडगाव नगर पंचायतीची स्थापना होऊन पहिल्यांदा निवडणूक पार पडली. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये वडगाव नगरपंचायतीची मुदत संपली होती. मात्र विविध कारणांमुळे निवडणुका लांबणीवर पडल्या. यामुळे आता तब्बल सात वर्षांनंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत असल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. तसेच पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रभाग रचना प्रक्रियेचा कालावधी
११ ते १६ जून : प्रगणक गटांची आखणी, प्रारूप प्रभाग रचना करणे
१७ व १८ जून : जनगणनेच्या माहितीची पडताळणी करणे
१९ ते २३ जून : संबंधित क्षेत्रांची स्थळ पाहणी करणे
२४ ते ३० जून : गुगल मॅपवर प्रभाग नकाशे तयार करणे
१ ते ३ जुलै : नकाशावर निश्चित केलेल्या क्षेत्रांची प्रत्यक्ष पाहणी
४ ते ७ जुलै : प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीची स्वाक्षरी
८ ते १० जुलै : मसुदा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणे

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कुंडमळा ठिकाणी दर्शक गॅलरी असणारा पूल उभारणार, अतिरिक्त निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन
– जिल्ह्यातील सर्व पुल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलकांची ७ दिवसात बांधकाम तपासणी करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
– वडगाव नगरपंचायतीकडून शहराचा प्रारूप विकास आराखडा (डीपी) प्रसिद्ध । Vadgaon Maval Nagar Panchayat


dainik maval jahirat

Previous Post

जिल्ह्यातील सर्व पुल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलकांची ७ दिवसात बांधकाम तपासणी करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Next Post

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत होणार हवामान केंद्रांची उभारणी ; महावेध प्रकल्पास पाच वर्षांची मुदतवाढ

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Weather stations

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत होणार हवामान केंद्रांची उभारणी ; महावेध प्रकल्पास पाच वर्षांची मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.