Dainik Maval News : जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर ब्राम्हणवाडी गावच्या हद्दीत मंगळवारी (दि. 24 जून) दुपारी पावणे चारच्या सुमारास कारला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण जखमी झाला.
सुनील भरत जाधव (वय १९, रा. शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर शुभम सुनील सोनवणे (वय २१, रा. तळेगाव दाभाडे) हा युवक जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम आणि त्याचा मित्र सुनील हे दोघे जण लोणावळा येथील एका हॉटेलमध्ये कामाला आहेत. मंगळवारी दुपारी ते कामावरून दुचाकीवरून तळेगाव दाभाडे येथे घरी येत होते. ब्राम्हणवाडी गावच्या हद्दीत त्यांच्या दुचाकीने पुढे चाललेल्या एका मोटारीला धडक दिली. त्यात सुनील गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी तळेगाव येथील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पावसाळ्यात फिरायला जायचंय? पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पावसाळ्यात स्वर्गच, ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
– महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती ! २० हजार ७८७ कोटींची तरतूद ; बारा जिल्ह्यांना जोडणारा ८०२ कि.मी. लांबीचा द्रुतगती मार्ग
– मावळ लोकसभा क्षेत्रातील पनवेल विमानतळ सप्टेंबरपासून सुरू होणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
– कार्यकर्ते हेच आमचे खरे बलस्थान, पुढील प्रत्येक निर्णय त्यांच्याच सल्ल्याने घेणार – आमदार सुनील शेळके