व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लम्पी चर्मरोग प्रादूर्भावामुळे मावळ तालुक्यातील पशूधन धोक्यात ; तातडीने लसीकरण मोहीम हाती घेण्याबाबत प्रशासनाला निवेदन । Maval News

लम्पी चर्मरोग नियंत्रणासाठी जनावरांचे लसीकरण करण्याबाबत मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकासअधिकारी आणि पशू वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 8, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Maval NCP Statement To BDO Veterinary Officer regarding vaccination to control lumpy skin disease

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पशूधनांना लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. पशुधनासाठी हा विषाणूजन्य साथीचा आजार असल्याने तालुक्यातील काही जनावरांना त्याची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेषतः गाई आणि बैलांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येत असून यामुळे पशुधन व दुग्ध, शेती व्यवसाय धोक्यात येऊ शकतो.

  • लम्पी चर्मरोगास वेळीच आटोक्यात आणून पशुधनांना वाचविण्यासाठी तात्काळ उपाययोजना करून संपूर्ण मावळ तालुक्यातील पशुधनांना मोठ्या प्रमाणात लसीकरण करून योग्य ती काळजी घ्यावी आणि लस पुरवठा अधिक जलद गतीने करावा, असे निवेदन मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने गटविकास अधिकारी, पंचायत समिती मावळ यांना दिले आहे.

मावळ तालुक्यातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय प्राधान्य देत आहेत. त्यामुळे तालुक्यात गायींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सततच्या अतिवृष्टी पावसामुळे कीड रोगाचा प्रादुर्भाव होत असून शेतकऱ्यांच्या हातातील खरीप हंगाम निघून गेला आहे, त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पशुधनाला लंपी चर्म रोगापासून वाचविण्यासाठी लसीकरण आणि औषध उपचार १०० टक्के मोफत होणे आवश्यक आहे.

मावळ तालुक्यातील पशुधन या रोगापासून बचाव करण्यासाठी मावळ पंचायत समिती स्तरावर, जिल्हा परिषद स्तरावर आवश्यक असणाऱ्या उपाय योजना सुरू कराव्यात व हा चर्मरोग लंपी आजार नष्ट करण्याची आवश्यक असणारी लसीकरण तात्काळ तालुक्यात उपलब्ध करून संबंधित डॉक्टरांना प्रत्येक गोठ्यावरती घरी जाऊन हे लसीकरण मोफत करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन मावळ पंचायत समिती गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान व पशु वैद्यकीय अधिकारी राक्षे यांना देण्यात आले.

याप्रसंगी पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, तालुका प्रभारी तथा पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग अतुल राऊत, युवक तालुकाध्यक्ष विशाल वहिले, अल्पसंख्यांक अध्यक्ष आफताब सय्यद, तालुका उपाध्यक्ष अनिल खांदवे, वडगाव शहराध्यक्ष सोमनाथ धोंगडे, युवक अध्यक्ष सुनिल चव्हाण, मा.ग्रा. पं. सदस्य बारकूभाऊ ढोरे, योगेश भेगडे आदी उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ तालुक्यातील कोअर कमिट्या जाहीर ; सुकाणू समितीसह सात विभागीय कमिट्या – पाहा यादी
– तळेगाव दाभाडे कट प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना ; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती
– “बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर” ; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे


Previous Post

लोणावळा बस स्थानकाचे रूपडे पालटणार ! टेंडर प्रक्रिया पूर्ण करून लवकर काम सुरू होणार ; परिवहन मंत्र्यांचे आश्वासन । Lonavala News

Next Post

पवना धरणावर धोकादायक पद्धतीने डागडुजी ; धरण 75 टक्के भरलेले असताना सांडव्यावर क्रेन चढवून दुरुस्तीचे काम । Pavana Dam

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pavana Dam Repairs in Dangerous Way Repairs were carried out by crane on spillway when dam 75 percent full

पवना धरणावर धोकादायक पद्धतीने डागडुजी ; धरण 75 टक्के भरलेले असताना सांडव्यावर क्रेन चढवून दुरुस्तीचे काम । Pavana Dam

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Kamshet police take drastic action 2 accused of smuggling MD Mephedrone arrested

कामशेत पोलिसांची धडक कारवाई ! एमडी (मेफेड्रोन) तस्करी करणारे २ आरोपी जेरबंद, २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

May 6, 2026
BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.