Dainik Maval News : मावळ तालुका मराठी पत्रकार संघ संलग्न, देहू – देहूरोड मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी देहूरोड येथे झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सल्लागार सोनबा गोपाळे गुरुजी, तसेच सचिव रामदास वाडेकर, प्रकल्प प्रमुख गणेश विनोदे यांच्या उपस्थित देहू – देहूरोड मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यामध्ये ज्येष्ठ पत्रकार रमेश कांबळे यांची पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी गणेश दुडम यांची नियुक्ती करण्यात आली. संपूर्ण कार्यकारिणी पुढील प्रमाणे;
रमेश कांबळे (अध्यक्ष), गणेश दुडम (उपाध्यक्ष), चैत्राली राजापूरकर (कार्याध्यक्ष), राजेंद्र काळोखे (सचिव), रामकुमार आगरवाल (प्रकल्प प्रमुख), मुकुंद परंडवाल (सदस्य), देवराम भेगडे (सदस्य), सचिन गायकवाड (सदस्य) बद्रीनारायण घुगे (सदस्य) आणि आकाश कानापुरम (सदस्य) अशी नव्याने जाहीर केलेली कार्यकारणी असून या कार्यकरणीचा कालावधी एक वर्षांचा असणार आहे.
जरी प्रत्येक पत्रकार हा वेगवेगळ्या वृत्तपत्रात, वृत्तवहिनीत काम करीत असला तरी एकजूट महत्वाची आहे. म्हणूनच मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक पत्रकाराच्या मागे मावळ तालुका पत्रकार संघ खंबीरपणे उभा राहील. नवीन तंत्रज्ञान आल्याने बातमीदारी करणे पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले असले तरी पत्रकारांच्या समोर विविध आवाहने उभी असतात, त्यासाठी पत्रकारांची एकजूट महत्वाची आहे, असे सोनबा गोपाळे यांनी सांगितले.
तर, मावळ तालुक्यातील पत्रकारांच्या हितासाठी मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली आहे. देहू – देहूरोड पत्रकार संघ आता या पत्रकार संघाशी संलग्न झाला आहे. पत्रकार संघाच्या माध्यमातून तालुक्यातील पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावणे , सामाजिक उपक्रम राबविणे अशी उद्दिष्ट असणार आहेत, असे सुदेश गिरमे यांनी सांगितले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शिष्यवृत्ती परीक्षेत टाकवेतील विद्यार्थ्यांना घवघवीत यश ; दोन विद्यार्थिनींना जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान । Maval News
– महत्वाचा निर्णय ! पीएमआरडीए क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी १५ दिवसांची अंतिम मुदत
– देहूरोड कॅन्टोन्मेंट भागातील विकासकामांसाठी विशेष निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ; पालखी मार्गाच्या विकासाची घोषणा
– महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय ! ‘गणेशोत्सव’ महाराष्ट्र राज्याचा अधिकृत ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित