Dainik Maval News : मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य संलग्न मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या अंतर्गत (संलग्न) वडगाव शहर मराठी पत्रकार संघाची स्थापना सोमवारी (दि. १४ जुलै) करण्यात आली. यावेळी संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून संघाच्या अध्यक्षपदी सतीश गाडे, कार्याध्यक्षपदी दिलीप कांबळे तर उपाध्यक्षपदी विशाल कुंभार यांची निवड करण्यात आली आहे. मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व वडगाव शहर मराठी पत्रकार संघाचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत व सर्व संमतीने ही निवड जाहीर करण्यात आली.
याप्रसंगी मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे, सचिव रामदास वाडेकर, प्रकल्पप्रमुख गणेश विनोदे, सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे, बबनराव भसे, ज्ञानेश्वर वाघमारे, उपाध्यक्ष भारत काळे, खजिनदार संकेत जगताप, कायदेशीर सल्लागर अॅड किशोर ढोरे, कार्यकारिणी सदस्य सचिन शिंदे, पदसिद्ध सदस्य रेश्मा फडतरे, चेतन वाघमारे, कामशेत शहर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुभाष भोते आणि वडगाव शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते.
- मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. गिरमे, सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार श्री. गोपाळे, श्री. भसे यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीस निवड पत्र देण्यात आले. याप्रसंगी बोलताना श्री गिरमे यांनी, नव्याने स्थापन करण्यात आलेल्या वडगाव शहर मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीस शुभेच्छा देऊन तालुका कमिटीच्या नियोजनाची अंबमलबजावणी करणे व पत्रकारांच्या कल्याणकारी योजना व सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. सल्लागार श्री. गोपाळे यांनी नूतन कार्यकारिणीस शुभेच्छा देत तालुका संघाच्या सोबत शहर संघाचे स्वतंत्र अस्तित्व जपत काम करीत राहण्याचा सल्ला दिला.
एक वर्षासाठी निवडण्यात आलेली वडगाव शहर मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी व सदस्य :
अध्यक्ष – श्री. सतीश गाडे (दै. नवराष्ट्र), कार्याध्यक्ष – श्री. दिलीप कांबळे (साम टिव्ही), उपाध्यक्ष – श्री. विशाल कुंभार (दैनिक मावळ), सचिव – श्री. संजय दंडेल (सह्याद्रीनामा), पत्रकार परिषद प्रमुख – श्री. सचिन सोनावणे (दै. पुण्यनगरी),
सदस्य – ज्ञानेश्वर वाघमारे (दै. सकाळ), सुदेश गिरमे (दै. लोकमत), गणेश विनोदे (दै. पुढारी), बाळासाहेब भालेकर (ज्येष्ठ पत्रकार), अॅड. किशोर ढोरे (दै. प्रभात)
मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव रामदास वाडेकर यांनी निवड सभेचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले. वडगाव शहर मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सतीश गाडे यांनी सर्वांचे आभार मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे दरम्यानचा ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– अत्यंत आनंदाची बातमी! किल्ले लोहगडासह ‘या’ १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश ; शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
– कौतुकास्पद! टाकवे गावातील रिक्षा चालकाचा मुलगा बनला सनदी लेखापाल (सीए), आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना