व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहर मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सतीश गाडे, उपाध्यक्षपदी विशाल कुंभार, तर कार्याध्यक्षपदी दिलीप कांबळे यांची निवड

मावळ तालुका मराठी पत्रकार संघ संलग्न वडगाव शहर मराठी पत्रकार संघाची स्थापना

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 14, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Vadgaon City Marathi Journalists Association established new executive announced Maval Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य संलग्न मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या अंतर्गत (संलग्न) वडगाव शहर मराठी पत्रकार संघाची स्थापना सोमवारी (दि. १४ जुलै) करण्यात आली. यावेळी संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून संघाच्या अध्यक्षपदी सतीश गाडे, कार्याध्यक्षपदी दिलीप कांबळे तर उपाध्यक्षपदी विशाल कुंभार यांची निवड करण्यात आली आहे. मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व वडगाव शहर मराठी पत्रकार संघाचे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत व सर्व संमतीने ही निवड जाहीर करण्यात आली.

याप्रसंगी मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे, सचिव रामदास वाडेकर, प्रकल्पप्रमुख गणेश विनोदे, सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे, बबनराव भसे, ज्ञानेश्वर वाघमारे, उपाध्यक्ष भारत काळे, खजिनदार संकेत जगताप, कायदेशीर सल्लागर अॅड किशोर ढोरे, कार्यकारिणी सदस्य सचिन शिंदे, पदसिद्ध सदस्य रेश्मा फडतरे, चेतन वाघमारे, कामशेत शहर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुभाष भोते आणि वडगाव शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते.

  • मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. गिरमे, सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार श्री. गोपाळे, श्री. भसे यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीस निवड पत्र देण्यात आले. याप्रसंगी बोलताना श्री गिरमे यांनी, नव्याने स्थापन करण्यात आलेल्या वडगाव शहर मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीस शुभेच्छा देऊन तालुका कमिटीच्या नियोजनाची अंबमलबजावणी करणे व पत्रकारांच्या कल्याणकारी योजना व सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. सल्लागार श्री. गोपाळे यांनी नूतन कार्यकारिणीस शुभेच्छा देत तालुका संघाच्या सोबत शहर संघाचे स्वतंत्र अस्तित्व जपत काम करीत राहण्याचा सल्ला दिला.

एक वर्षासाठी निवडण्यात आलेली वडगाव शहर मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी व सदस्य :
अध्यक्ष – श्री. सतीश गाडे (दै. नवराष्ट्र), कार्याध्यक्ष – श्री. दिलीप कांबळे (साम टिव्ही), उपाध्यक्ष – श्री. विशाल कुंभार (दैनिक मावळ), सचिव – श्री. संजय दंडेल (सह्याद्रीनामा), पत्रकार परिषद प्रमुख – श्री. सचिन सोनावणे (दै. पुण्यनगरी),
सदस्य – ज्ञानेश्वर वाघमारे (दै. सकाळ), सुदेश गिरमे (दै. लोकमत), गणेश विनोदे (दै. पुढारी), बाळासाहेब भालेकर (ज्येष्ठ पत्रकार), अॅड. किशोर ढोरे (दै. प्रभात)

मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव रामदास वाडेकर यांनी निवड सभेचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले. वडगाव शहर मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सतीश गाडे यांनी सर्वांचे आभार मानले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे दरम्यानचा ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– अत्यंत आनंदाची बातमी! किल्ले लोहगडासह ‘या’ १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश ; शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
– कौतुकास्पद! टाकवे गावातील रिक्षा चालकाचा मुलगा बनला सनदी लेखापाल (सीए), आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील ६५ शाळांमधील इयत्ता दहावीच्या वर्गात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा तळेगाव येथे सन्मान । Maval News

Next Post

पुणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विजय सुराणा, मावळ तालुका अध्यक्षपदी सचिन ठाकर यांची निवड

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vijay Surana Sachin Thakar appointed in executive committee of Pune District Rural Association

पुणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विजय सुराणा, मावळ तालुका अध्यक्षपदी सचिन ठाकर यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.