Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, राज्य समन्वयक नितिन शिंदे, पुणे जिल्हा अध्यक्ष तथा पत्रकार हल्ला कृती समिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन चपळगावकर, राज्य सहसंपर्कप्रमुख पराग कुकुळवाल यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, संचलित पुणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विजय सुराणा, तर मावळ तालुका अध्यक्षपदी सचिन ठाकर वडगाव यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी आमदार शंकर जगताप यांनी सांगितले की, पत्रकारांच्या समस्येवर आगामी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुसज्ज असे पत्रकार भवन आगामी काळात वीस गुंठ्यामध्ये उभा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी सर्व पत्रकारांना त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्यातील २५ हजारांपेक्षा जास्त पत्रकार हे संघटनेशी जोडले असून संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागात पत्रकार संघाचे काम सुरू आहे. भविष्यात संघटनेतील प्रत्येक पत्रकारांना आरोग्य व शासनाच्या सोईसुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात काम सुरू आहे.तसेच संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे आश्वासन दिले.
विजय सुराणा यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मुंबई सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करताना सांगितले की जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व पत्रकारच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिल तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठे पत्रकार संघाचे अधिवेशन आगामी काळात मावळ तालुक्यात भरविले जाईल अशी ग्वाही दिली.
तसेच सचिन ठाकर यांनी सांगितले की मावळ तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांना एकत्रित करून अडीअडचणी सोडविण्यासाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही दिली.
यावेळी जेष्ठ पत्रकार सुशिल सैदाने, राजेंद्र काळोखे, तसेच महादेव वाघमारे, धनंजय नांगरे, योगेश घोडके, अभिषेक बोडके, सुभाष भांडे, सचिन मोरे आदी पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद सदांण, आभार अतुल क्षिरसागर यांनी व्यक्त केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे दरम्यानचा ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– अत्यंत आनंदाची बातमी! किल्ले लोहगडासह ‘या’ १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश ; शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
– कौतुकास्पद! टाकवे गावातील रिक्षा चालकाचा मुलगा बनला सनदी लेखापाल (सीए), आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना