Dainik Maval News : आंदर मावळ विभागात निसर्ग सौंदर्य चांगलेच खुलले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे डोंगरावरून कोसळणारे धबधबे आणखीन सुंदर भासत असून हिरवळीने नटलेला हा परिसर पाहण्यासाठी राज्यभरातून नागरिक आंदर मावळात येत आहे. जुलैच्या सुरूवातीपासूनच येथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. अशात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.
सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे आंदर मावळातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी होण्यास सुरू झाली असून परिसरात कोणीही अनुचित प्रकार घडू म्हणून खबरदारी म्हणून पोलिसांकडून फळणे फाटा येथे गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच पर्यटकांना गाडी चालवताना सुरक्षतेचे नियम पाळावे, हेल्मेट वापरावे, तसेच गाडीचा वेग नियंत्रित ठेवणे मद्यप्राशन करु नये अशा सूचना देण्यात येत आहे.
वडेश्वर, डाहुली, लालवाडी, बेंदेवाडी, खांडी आदी ठिकाणी पर्यटक मोठी गर्दी करतात. पाच वाजल्यानंतर पोलिस परिसरात जाऊन पर्यटकांना माघारी जाण्याची सुचना करत आहेत. पोलीस निरीक्षक वडगाव मावळ कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार सचिन देशमुख, पोलीस हवालदार शशिकांत खोपडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत भोईर यांच्या कडून चोख बंदोबस्त परिसरात ठेवण्यात आला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे दरम्यानचा ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– अत्यंत आनंदाची बातमी! किल्ले लोहगडासह ‘या’ १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश ; शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
– कौतुकास्पद! टाकवे गावातील रिक्षा चालकाचा मुलगा बनला सनदी लेखापाल (सीए), आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना