Dainik Maval News : राज्यात पुढील २४ तासासाठी रायगड, रत्नागिरी, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट परिसरात रेड अलर्ट देण्यात आला असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
पवना धरणातून नदीपात्रात 4400 क्युसेक विसर्ग – ‘’पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की पवना धरण सद्यस्थितीमध्ये 84.87% भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता सद्यस्थितीत नदीपात्रामध्ये सांडव्यावरून 1500 क्युसेक्स, तर जलविद्युत केंद्रातून 1000 क्युसेक्स असा एकूण 2500 क्युसेक्स विसर्ग चालू आहे.
तरी, रात्री 20:00 वाजता सांडव्यावरील विसर्ग वाढवून 3000 क्युसेक्स तर जलविद्युत केंद्रामधील विसर्ग वाढवून 1400 क्युसेक्स करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पवना नदीपात्रामध्ये एकूण विसर्ग 4400 क्युसेक्स इतका राहणार आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.
तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, कोणीही नदीपात्रात उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे.’’ – पवना धरण पूरनियंत्रण कक्ष
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना दिनांक २५ जुलै २०२५ सायंकाळी ५.३९ ते दि. २७ जुलै २०२५ रात्रौ ८.३० पर्यंत ४.१ ते ४.८ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मोडक सागर, मध्य वैतरणा, तानसा धरणातुन विसर्ग सुरू
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात पाणी पुरवठा करणाऱ्या मोडक सागर, मध्य वैतरणा आणि तानसा या धरणातुन अनुक्रमे ४४८८.२५, २०१२.६७ आणि ३३१५.२५ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळी ओलांडली असून नागरीकांना सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! पवन मावळात अतिमुसळधार पाऊस, पवना धरण 83 टक्के भरले, अकरा वाजता धरणाचे दरवाजे उघडणार
– वडगावात यंदा डीजे मुक्त गणेशोत्सव? नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे सामुहिक निर्णय, नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई
– रोजगार हमी योजनेला नवे बळ ; आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली समितीची सक्रिय बैठक संपन्न । Maval News
– व्हिडिओ : मावळ तालुक्यातील गणपतीचे गाव असलेल्या शिळींब येथील गणेशमूर्ती कारखान्यांत कारागिरांची लगबग !