Dainik Maval News : पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या मावळ तालुक्यातील लोणावळा शहरात पावसाचा जोर कायम असलेला दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून लोणावळा शहर आणि परिसरात अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे लोणावळा शहरत येणाऱ्या पर्यटकांसह लोणावळेकर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बुधवार, दिनांक 26 जुलै रोजी सकाळी सात वाजता घेतलेल्या नोंदीनुसार लोणावळा शहरात 24 तासांत तब्बल 172 मि.मी. अर्थात 6.77 इंच इतका पाऊस झाला. तर, 1 जून 2025 पासून आजमितीस एकूण 3480 पाऊस झाला आहे. गतवर्षी दिनांक 1 जून 2024 ते 23 जुलै 2024 दरम्यान एकूण 3210 मि.मी. इतका पाऊस झाला होता. याचा अर्थ यंदा पावसाचा जोर जून-जुलै महिन्यात अधिक असलेला दिसतो.
समाधानकारक पावसामुळे लोणावळा शहर आणि परिसरातील निसर्ग चांगलाच फुलला आहे. शहराजवळील प्रमुख पर्यटनस्थळ असलेले भूशी धरण 14 जून रोजी ओव्हरफ्लो झाले आहे. तर शहराजवळील डोंगराळ भागातील सर्व धबधबे प्रवाहित झाले आहेत, यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक वर्षा पर्यटनासाठी लोणावळा नगरीत दाखल होत आहेत. यामुळे स्थानिक लहान मोठे विक्रेत्यांना अच्छे दिन आले आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील सहा जिल्ह्यांसह पुणे घाट माथ्यावर पावसाचा रेड अलर्ट ; पवना धरणातून नदीपात्रात 4400 क्युसेक विसर्ग सुरू
– मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ कोसळलेली दगड, झाडी हटविली ; वाहतूक पूर्ववत झाल्याने प्रवाशांना दिलासा
– सर्पमित्रांना स्वतंत्र ओळखपत्र, कुटुंबियांना १५ लाखांचा अपघाती विमा आदी मागण्यांबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार
– उपवास म्हणजे काय? तो का आणि कसा करावा? श्रावण मासात उपवासाचे महत्व, साबुदाणा खिचडी उपवासाला खरंच चालते का ? प्रत्येकाने वाचावा असा लेख